कळंगुट मध्ये उघड्यावर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या 9 पर्यटकांना अटक,कोल्हापुर येथील दोघांचा समावेश

0
797
गोवा खबर:गोव्यात येऊन दारू पिऊन मजा करायची असे ठरवून गोव्यात येत असाल तर सावधान.कळंगुट पोलिसांनी आज धडक कारवाई करत कळंगुट परिसरात उघड़यावर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या 9 पर्यटकांना अटक केली. यातील दोघे कोल्हापुर, महाराष्ट्र येथील आहेत.
उघड्यावर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या पर्यटकांचा गोव्याच्या पर्यटनाला फटका बसत असल्याच्या आरोपा नंतर पोलिसांनी कडक भूमिका घेत आशा तर्राट पर्यटकांवर कारवाई सुरु केली आहे.
कळंगुटचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहिती नुसार आज ही कारवाई करण्यात आली.कळंगुट मधील पदपथ,किनाऱ्यावर आणि वाहनतळावर दारू पिणाऱ्यां विरोधात ही कारवाई करण्यात आली.
अटक करण्यात आलेत्यां मध्ये संदीप पाटील आणि नारायण पाटील या कोल्हापुर येथील दोन पर्यटकांचा समावेश आहे.याशिवाय हैदराबाद- आंध्रप्रदेश मधील तिरुपती गुड्डम,कपिल अंजानेलु,सतीश बाबू यांचा समावेश आहे.उर्वरीत कर्नाटक मधील असून त्यात सागर बेंतुर, राघवेंद्र मेघराज,रुद्रेश महेश आणि राजेश नागराजप्पा यांचा समावेश आहे.
यापुढे सर्वत्र गस्त वाढवुन असे प्रकार घडत असतील तर त्यावर कडक कारवाई केली जाईल असे, दळवी यांनी स्पष्ट केले आहे.2018 मध्ये 35 जणांवर अशीच कारवाई कळंगुट पोलिसांकडून करण्यात आली होती.