कळंगुट मधील मोबाइल चोरास मडगावमध्ये अटक

0
946

पणजी:कळंगुट येथील एका स्पा मधील ग्राहकाचा मोबाइल चोरुन पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरटयाच्या मुसक्या कळंगुट पोलिसांनी मडगाव रेल्वे स्टेशनवर आवळल्या.चोरीस गेलेला मोबाइल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
बुधवारी कळंगुट येथील एका स्पा मधून मोहम्मद इर्शाद यांचा चार्जिंगला लावलेला 30 हजार रुपये किंमतीचा मोबाइल यातलो यल्लापुर याने गपचूप चोरुन नेला होता.आपला मोबाइल गायब झाल्याचे इर्शाद यांच्या नजरेस आले त्यावेळी त्यानी कळंगुट पोलिसांत तक्रार नोंदवली. कळंगुट पोलिसांनी स्पा मधील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यावेळी यातलो याने मोबाइल लंपास केल्याचे आढळून आले.यातलो हा टॅक्सी चालक असून तो काही पर्यटकांना घेऊन मडगाव येथून कळंगुट मध्ये आला होता.कळंगुट पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पोलिस हेड कॉन्स्टेबल सतीश सावंत यांना मडगाव मध्ये पाठवून यातलोचा शोध घेतला.यातलो हा मडगाव रेल्वे स्टेशनवर कर्नाटक मध्ये पळून जाण्याच्या तयारीत असताना कळंगुट पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेला मोबाइल जप्त केला आहे.यातलोला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरु आहे.