गोवा खबर: कळंगुटचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी आज सांताक्लॉज बनून स्थानिक अनाथालय आणि वृद्धाश्रमात जाऊन अनोख्या पद्धतीने साजरा केला ख्रिसमस.
पोलिस निरीक्षक दळवी यांनी सहकाऱ्यां सोबत आज कळंगुट येथील सेंट अँथनी अनाथालयात सांताच्या वेषात जाऊन  मिठाई वाटली. मुलांनी ख्रिसमस गीत गाउन त्यांचे स्वागत केले.दळवी यांनी मुलांना चॉकलेट आणि मिठाई वाटल्या नंतर यशस्वी होण्यासाठी मेहनत घ्या असा सल्ला दिला.
त्यानंतर दळवी आणि सहकारी सरकारी वृद्धाश्रमात गेले तेथील वृद्धाशी संवाद साधत त्यांनी त्यांना जीवनावश्यक वस्तू आणि मिठाई वाटून आशीर्वाद घेतले.पोलिस तुमच्या कुटुंबातील असून सदैव तुम्हाला मदत करतील असे आश्वासन त्यांनी दिले.पोलिस आणि जनतेमधील संबंध अधिक दृढ व्हावेत यासाठी असे उपक्रम राबवत असल्याचे दळवी यांनी यावेळी सांगितले.
दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली कळंगुट पोलिस स्टेशनच्या बाहेर मोठा गोठा बनवण्यात आला आहे.कळंगुट पोलिस पोलिस स्टेशनमध्ये गणेशोत्सव आणि ख्रिसमस तेवढयाच उत्साहाने साजरा करतात.