कळंगुट पोलिसांनी उध्वस्त केले सेक्स रॅकेट, दोघांना अटक,दोन युवतींची सुटका

0
976

गोवा:कळंगुट पोलिसांनी आज दुपारी सेक्स रॅकेट उध्वस्त करत 2 दलालांना अटक केली.त्याशीवाय 2 युवतींची सुटका करण्यात यश मिळवले. पोलिसांनी 2 स्कूटर,7 मोबाइल्स आणि 15 हजार रूपयांची रोकड जप्त केली आहे.
कळंगुट परिसरात सेक्स रॅकेट सुरु असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी सवेरा या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने सापळा रचला.बनावट ग्राहक तयार करून दलालांशी संपर्क साधून त्यांना मुलींसह आगारवाडो येथील पिंपळाच्या झाड़ाकडे बोलावले. दोघे दलाल पोलिसांच्या सापळ्यात बरोबर अडकले.फिरोज खान(जोगेश्वरी,मुंबई)आणि विजय मोहनलाल मदन पूरी(जयपुर,राजस्थान)हे दोघे स्कूटरवरुन दोन युवतींना घेऊन पिंपळाजवळ आले असता पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांनी दलालांकडून 7 मोबाइल्स फोन जप्त केले असून त्याद्वारे त्यांच्या नेटवर्कचा शोध लावणे पोलिसांना शक्य होणार आहे.पोलिसांनी GA07-03-AB-9115 आणि GA-03-D-7854 नंबरच्या 2 स्कूटर्ससह 15 हजार रूपयांची रोकड़ दोघांकडून जप्त केली आहे.वेश्या व्यवसायात ढकलल्या गेलेल्या कोलकाता आणि दिल्ली येथील युवतींची सुटका करून त्यांची रवानगी मरेशी येथील अपना घर मध्ये केली आहे.या करवाई मध्ये पोलिस निरीक्षक जीवबा दलळी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरिक्षक विद्येश पिळगावकर,पोलिस उपनिरीक्षक सीताराम मळीक, करिश्मा परुळेकर,पोलिस कॉन्स्टेबल संज्योत केरकर,लुइन्स परेरा सहभागी झाले होते.