कळंगुट पोलिसांकडून 3 अल्पवयीन मुलांची सुटका;अपना घर मध्ये केली रवानगी

0
1402
गोवा खबर:किनाऱ्यावर वस्तू विकत फिरणाऱ्या 3 अल्पवयीन मुलांची सुटका करून कळंगुट पोलिसांनी त्यांची रवानगी मरेशी येथील अपना घर मध्ये केली आहे.
किनारी भागात अल्पवयीन मुलांचे कोणत्याही प्रकारचे शोषण होऊ नये यासाठी कळंगुट पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
गेले दोन दिवस कळंगुट पोलिसांनी स्कॅन इंडिया या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने किनारपट्टी भागाची बारकाईने पाहणी केली होती.त्यावेळी त्यांना 3 अल्पवयीन मुले छोट्या मोठ्या वस्तू विकत फिरत असल्याचे आढळून आली.त्यांच्या सोबत पालक नसल्याचे आढळून आल्याने त्यांचे शोषण होऊ नये यासाठी त्यांची रवानगी मरेशी अपना घर मध्ये केली.
अल्पवयीनां मध्ये मूळ उत्तर प्रदेश मधील 14 आणि 15 वर्षाचे 2 मुलगे आणि एक 14 वर्षांची मुळ कर्नाटक मधील मुलीचा समावेश आहे.बाल कल्याण समितीच्या निर्देशा नुसार या तिन्ही मूलांची रवानगी मरेशी येथील अपना घर मध्ये करण्यात आली आहे.
कळंगुटचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यासंदर्भात माहिती देताना म्हणाले,या पुढे देखील आम्ही दक्ष राहून पर्यटन क्षेत्रात बालकांचे कोणत्याही प्रकारचे शोषण होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेणार आहोत. मुलांचे भवितव्य सुरक्षित राहो यासाठी कळंगुट पोलिस नेहमीच प्रयत्नशील असणार आहेत.