कळंगुट पोलिसांकडून सेक्स रॅकेट उध्वस्त;2 दलालांना अटक,दोन युवतींची सुटका

0
1088


पणजी:कळंगुट पोलिसांनी आज आगरवाडो येथून चालवले जात असलेले सेक्स रॅकेट उध्वस्त करून महाराष्ट्रातील 2 दलालांना अटक केली. त्याशिवाय प.बंगाल मधील 2 युवतींची सुटका करण्यात यश मिळवले.
पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांना खात्रीशीर सुत्रांकडून या सेक्स रॅकेटची माहिती मिळाली होती.त्यानंतर त्यांनी सवेरा या एनजीओच्या मदतीने सापळा रचून पुणे येथील आशीष शर्मा आणि ठाणे येथील मेघना नायर या दोन दलालांना अटक केली. त्यांच्याकडून 7 मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.पोलिसांनी या कारवाई मध्ये प.बंगाल मधील 2 युवतींची सुटका करून त्यांची रवानगी मरेशी येथील सुधारगृहात केली आहे.ही कारवाई पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.या पथकात पोलिस उपनिरीक्षक विदेश पिळगावकर,कीर्तीदास गावडे, पोलिस हवालदार सुभाष मालवणकर,विद्यानंद आमोणकर,समीर सावंत,लक्ष्मण पाटेकर,हर्षा पाडलोसकर आणि दीपा गुरव यांचा समावेश होता.पर्यटन हंगाम सुरु झाला नसुन ड्रग्स आणि वेश्याव्यवसायाला अजिबात थारा देणार नसुन यापुढे देखील कारवाई सुरुच राहणार असल्याचे दळवी यांनी स्पष्ट केले.