कळंगुट पोलिसांकडून सेक्स रॅकेट उध्वस्त,4 दलालांना अटक

0
1121
  • गोवा:कळंगुट पोलिसांनी ड्रग्स बरोबर वेश्याव्यवसाया विरोधात धडक मोहीम उघड़ली आहे.वेश्याव्यवसायाविरोधात कळंगुट पोलिसांनी नाईकवाडा येथील काझा रे एन हॉटेलमध्ये सुरु असलेले वेश्याव्यवसायाचे रॅकेट उध्वस्त केले. या हॉटेल मध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर कळंगुट पोलिसांनी छापा टाकून सात जणांना अटक केली. यात संतोष कार(ओडिशा)यमन अरोरा(हरयाणा)आणि रिम ओली या तिघा दलालांसह चौघा ग्राहकांचा समावेश आहे.यातील संतोषला वेश्याव्यवसाय प्रकरणी कळंगुट आणि मडगाव येथे अटक झालेली आहे. वेश्याव्यवसायाच्या निमित्ताने मुंबईहून आणलेल्या दोघा महिलांची यावेळी सुटका करण्यात आली.त्यांना मरेशी येथील अपना घर मध्ये पाठवण्यात आले आहे.दरम्यान यातील संशयीतांना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
    महिलांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली आय-२० कार, ९ मोबाईल तसेच ७० हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. कळंगुट पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे ज्या हॉटेल मध्ये हे रॅकेट सुरु होते त्याचे परवाने रद्द करावे यासाठी कळंगुट पोलिस ग्रामपंचायत आणि पर्यटन खात्याला पत्र लिहून कळवणार असल्याचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी स्पष्ट केले आहे.