कला आणि संस्कृती संचालनालयात संगीत कार्यक्रमाचे आयोजन

0
629

गोवा खबर : संस्कृती भवन पाटो येथील कला आणि संस्कृती संचालनालयाच्या संगीतशिक्षक शिक्षकांच्या तर्फे नवीन वर्ष शुभारंभी छोटेखानी संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुरवातीस संचालक सगुण वेळीप, अशोक परब (उपसंचालक, कला व संस्कृती) रमेश नाईक (उपसंचालक प्रशासन), शशिकांत जल्मी (एस.एल ओ), वामन कुट्टीकर (कार्यलयीन अधिक्षक) यांच्या हस्ते पारंपरिक समई प्रज्वलित करून संगीत कार्यक्रमाचे विधिवत उदघाटन करण्यात आले.

विद्येची देवता शारदेच्या स्तवनाने कार्यक्रमाची सुमधूर सुरवात झाली. यामध्ये शमिता सांतिनेजकर, शांता काजळे, निशिता फडते, रेश्मा म्हामल, मृणाल मठकर, रूपलता डिचोलकर, स्नेहा नाईक, मंगला बावदाणे, रक्षा गावंकर, लवू नाईक, विष्णू काजळे, पंकज कोठंबीकर, उदय माजिक, संतोष पार्सेकर आदिनी भाग घेतला. संवादिनी साथ रोहित खांडोळकर तर तबला साथ चेतन नाईक यांनी केली.

शेखर पर्वतकर आणि मंगला बावदाणे यांनी ‘शुक्रतारा मंदवारा’ हे जोडगीत सादर केले. त्यांना संवादिनीवर संदीप नागवेकर व तबलासाथ विशाल फातर्फेकर यांनी केली. कोरोनावर जागृती संदेश देणारे कोंकणी गीत प्रताप कालेकर यांनी स्वत: गीत रचून संगीतबध्द केले. त्यांना संवादिनीवर नितीन शिरगावकर, तबलासाथ पंकज नाईक, पाश्चात्य विभागातून संगीत शिक्षक पॉल पोआणि फेवन क्रुज यांनी गिटार वादन केले.

पंकज नाईक यांनी ‘हे सुरांनो चंद्र व्हा हे’ नाट्यगीत सादर केले. अरूण दातेंनी अरामर केलेले ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ हे भावगीत सामुहिकरित्या पेश केले. शेखर पर्वतकर, गिरीष नार्वेकर, गुरूदास बाणावलीकर, प्रदिप खोर्जुवेकर, बहार भोसले, प्रसाद पांगम, ऋषिकेश पांचाळ, अजित तारी, दर्शन गावस इत्यादिनी बहारदार सादरीकरण केले. संवादिनीवर संदिप नागवेकर व समीर जाधव, तर तबला साथ प्रसन्न सालकर आणि विशांत सुर्लेकर यांनी केले.

कार्यक्रमाची सांगता पं. जितेंद्रबुवा अभिषेकी रचित रागमाला सादर करून झाली. यात अनय तुयेकर, पाडुरंग परब, राहुल खांडोळकर, संतोष शेटकर, पंकज नाईक, किशोर पालकर, हनुमंत पालकर इत्यादींनी सहभाग दर्शविला. त्यांना संवादिनीवर संदिप नागवेकर आणि मनोहर गोरे, तर तबला साथ  विठ्ठल शेट्ये यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमासाठी आशिष रायकर यांनी बोर्डवर साथ करून रंगत आणली. संगीत कार्यक्रमाचे सुबध्द आयोजन तसेच उत्कृष्ट सादरणीकरण केल्याबद्दल खात्याचे संचालक सगुण वेळीप सरांनी संगीत शिक्षकांचे कौतुक तसेच शाबासकी थाप दिली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संगीत शिक्षक सुदन फडते यांनी केले. तर संगीत विभागाच्या मुख्य लिपिक असलेली अग्निक्षा पेडणेकर यांनी आभार मानले. कार्यक्रम आयोजित करण्यासाठी खास करून संगीत शिक्षक सनी राऊळ तसेच इतर शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.