कर्नाटकात प्रवेश घेण्यासाठी सरकारी यंत्रणाची स्थलांतरीत कामगारांना मदत

0
374

                 

                                   

गोवा खबर: लॉकडाऊनमुळे गोव्यात अडकून पडलेल्या स्थलांतरीत कामगारांना कर्नाटकात प्रवेश घेण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून त्यांची कर्नाटक सरकार सेवा सिंधू पमध्ये नावनोंदणी करून सरकारी यंत्रणा त्याना मदत करीत आहेत. कर्नाटकात त्यांच्या गावी परत जाण्यासाठी त्यांना प्रवेश पास  मिळविण्यासाठी मदत करण्यात येत आहे.

     सत्तरीतील केरीतील तपास नाक्यावर गेल्या तीन दिवसांपासून स्थलांतरीत कामगार खूल्या जागेत अन्न व निवा-याशिवाय उघड्यावर अडकून पडले आहेत अशी बातमी कांही दैनिकात छापून आली होती. गोवा सरकारने त्यांची त्वरीत दखल घेऊन त्यांना कदंब बसने म्हापसा येथील पेडे शेल्टर होममध्ये आणले. त्याना अन्न आणि इतर वस्तू पुरविल्या जात आहेत.

     केरी सत्तरीतील तपास नाक्याजवळ स्थलांतरीत कामगारांसाठी शामियाना उभारण्यात आला आहे.

     दरम्यान सरकारी यंत्रणा त्यांना गोव्यातून आपल्या गावी जाण्यासाठी परवानगी देण्यास त्यांची माहिती गोळा करीत आहे. ही माहिती सेवा सिंधू पव्दारे कर्नाटक राज्याला पाठविण्यात येईल. त्यामुळे त्यांना कर्नाटकातील त्यांच्यासंबंधित गावात प्रवेश करण्यासाठी परवाना मिळविण्यास मदत होईल.

     उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी कर्नाटक सरकारच्या अधिका-यांच्या सहकार्याने स्वता वैयक्तिकपणे देखरेख करीत आहेत.