करोना रोगाबाबतीत प्रवास करणाऱ्यांना केंद्रिय आरोग्य मंत्रालयाचा सल्ला

0
434

गोवा खबर:भारत सरकारच्या केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने चीन देशामध्ये पसरलेल्या करोना व्हायरस संसर्गामुळे चीनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय नागरिकानी चीनमध्ये जाण्याचे टाळावे असाही सल्ला देण्यात आला. यापुढे चीनमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांना भारतात परतल्यावर वेगळे ठेवण्याची व्यवस्था केली जाईल. तसेच चीनमधून भारत भेटीची योजना आखली आहे त्यानी हे लक्षात घ्यावे की सध्या अस्तित्वात असलेला व्हिसा (याअगोदर जारी केलेला व्हिसासह) वैध नसेल. नाईच्छुक प्रवाशांनी भारतीय व्हिसासाठी नव्याने अर्ज करण्यासाठी बीजिंगमधील दूतावास किंवा शांघाय येथील दूतावासात संपर्क साधता येतो. चीनमधील भारतीय दूतावास +8618610952903 आणि +8618612083629 अशा दोन हॉटलाईन क्रमांक २४ तास चालू राहील. तसेच ईमेल हेल्पडेस्क Beijing @mea.gov.in. वर संपर्क साधता येतो.

भारतीय नागरिकांनी गरज नसताना सिंगापूर, कोरिया, ईराण आणि इटालीचा अनिवार्य प्रवास करू नये असा सल्ला देण्यात आला आहे. सिंगापूर, कोरिया, ईराण आणि इटालीतून प्रवास करून भारतात येणाऱ्या लोकाना १४ दिवसासाठी वेगळे ठेवले जाईल आणि त्याची तपासणी करण्यात येईल.आरोग्यासंबंधी कोणत्याही तक्रारी असल्यास लोकांनी आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाच्या +91-23978046 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा ncov2019@ gmail.com या संकेत स्थळावर भेट द्यावी.

ज्याना या देशामध्ये प्रवास करावा लागतो त्यांनी खालील आरोग्यासंबंधित उपायांचे आचरण करावे. वैयक्तिक स्वच्छता राखावी, साबणाने हात वारंवार स्वच्छ धुवावे, खोकताना तोंड बंद करावे, थंडी, खोकला, नाक वाहणे हा रोग असलेल्या माणसाशी संपर्क टाळावा, न शिजलेले मांस खाणे टाळावे, फार्म, जनावरांचा बाजार किंवा जनावरे मारण्याच्या ठिकाणी जाणे टाळावे, थंडी किंवा नाक वाहत असल्यास मास्क वापरणे गरजेचे आहे.

भारतात परत येताना विमानात तुम्हाला रोग दिसत असल्यास रोगांविषयी विमानातील कर्मचाऱ्यांना माहिती देणे, मास्क बांधणे, आणि रोगांविषयी माहिती देण्याचा अर्ज भरणे, कुटुंबातील किंवा सहप्रवशांकडे संपर्क टाळावा, विमान कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे, तुरंत विमानतळ आरोग्य अधिकारी, देशांतर कार्यालयाला कळवावे आणि 011-23978046 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.

त्याचप्रमाणे रोग पसरलेल्या देशातून प्रवास करून आल्यानंतर २८ दिवसांच्या काळात रोगाची लक्षणे दिसत असल्यास 011-23978046 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, घर आणि इतरांपासून वेगळे रहावे, वैयक्तिक स्वच्छता राखावी, साबणाने हात वारंवार स्वच्छ धुवावे, खोकताना तोंड बंद करावे आणि जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा इस्पितळात संपर्क साधावा.