‘करण’ने शेअर केला यश आणि रूहीचा फोटो

0
1087
बॉलिवूडमधील निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यावर्षीच सरोगसीच्या मदतीने जुळ्या मुलांचा बाप झाला आहे. करणने स्वतः ट्विटरवरून याबाबतची माहिती जाहीर केली होती. इतके दिवस त्यानं आपल्या मुलांचा फोटो शेअर केला नव्हता. त्यामुळं यश आणि रूहीची एक झलक पाहण्यासाठी करणचे चाहते उत्सुक होते.रक्षाबंधनच्या दिवशी करणने यश आणि रूही या चिमुकल्या जुळ्या भावंडांचा एक गोड फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.याआधी आयफा अॅवार्डसाठी न्यूयॉर्कमध्ये असताना त्याला यश आणि रूही यांची त्याला खूप आठवण येत होती .त्यावेळी त्यानं एक फोटो शेअर केला होता. पण या फोटोत केवळ त्याच्या मुलांचे हातच दिसत होते.यश आणि रुही हॉस्पीटलमधून घरी येण्याआधीच करणने त्यांच्यासाठी एक खास खोली तयार करुन घेतली होती.शाहरूख खानची बायको गौरी खान हिने यश आणि रूही यांची ही खास खोली सजवली आहे.या खोलीमध्ये भडक रंगाचा वापर न करता पांढ-या शुभ्र रंगाचा वापर करण्यात आला असून यात सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहेत, ते म्हणजे कार्टून या खोलीतील भिंत्तीवरील चित्र आणि काही खेळणी.