कम्युनिटी रेडिओ कार्यशाळेचे माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या संयुक्त सचिवांच्या हस्ते उदघाटन

0
1138

 

 

गोवा खबर:केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव श्रीमती अंजू निगम यांच्या हस्ते इंटरनॅशनल सेंटर, दोनापावल येथे कम्युनिटी रेडिओ कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले. 21 ते 23 नोव्हेंबर 2018 असे तीन दिवस या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सिकींग मॉडर्न ऍप्लीकेशन्स फॉर रिअल ट्रान्सफॉर्मेशन (स्मार्ट) च्या मदतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

कम्युनिटी रेडिओ हा केंद्रसरकारचा फ्लॅगशिप कार्यक्रम आहे. वंचित आणि मुख्य प्रवाहात नसलेल्या समुदायापर्यंत पोहचण्यासाठीचे कम्युनिटी रेडिओ हे प्रभावी माध्यम आहे, असे श्रीमती अंजू निगम याप्रसंगी म्हणाल्या. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील 45 प्रतिनिधींची या कार्यशाळेसाठी उपस्थिती आहे.

‘स्मार्ट’च्या संचालिका श्रीमती अर्चना कपूर या प्रसंगी म्हणाल्या की वंचित समुदायांच्या सबलीकरणासाठी कम्युनिटी रेडिओ प्रभावी माध्यम आहे. व्यावसायिक रेडिओ केंद्रांपेक्षा याचे स्वरुप वेगळे आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कम्युनिटी रेडिओचा अभाव असलेल्या जिल्ह्यांसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. आपल्याकडे सध्या कम्युनिटी रेडिओला भरपूर वाव आहे. सध्या देशभरात 240 कम्युनिटी रेडिओ केंद्र कार्यरत आहेत.