पणजी:ऑर्चिड ग्रुपच्या वतीने यंदा सलग सातव्या वर्षी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 8 महिलांचा ऑर्चिड अवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला.दरवर्षी प्रमाणे ऑर्चिड ग्रुपने यंदाही शिक्षण,कला आणि संस्कृती, समाजसेवा,क्रीडा, ग्रामीण विकास,उद्योग,पत्रकारिता आणि मुलींचे संगोपन या क्षेत्रात चांगले काम केलेल्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते ऑर्चिड अवॉर्ड देऊन गौरव केला. ऑर्चिड अवॉर्ड विजेत्यांमध्ये डॉ. अपर्णा पालयेकर,ज्योती धोंड, ऑदेत मास्कारेन्हस, नंदिता डिसोझा,परपेतुवा फर्नांडिस,श्रीमी पाणंदीकर,सुवर्णा फोंसेको,स्वेरा ब्रागांझा यांचा समावेश होता.हा कार्यक्रम एनआरबी ग्रुपच्या सहकार्याने आयोजीत करण्यात आला होता.यावेळी उद्योगपती नाना बांदेकर,पोलिस अधीक्षक कार्तिक कश्यप,स्वप्निल अस्नोडकर,राजेश धेंपे, हर्षवर्धन भाटकुळी,मांगिरीश पै रायकर,प्रियंका राव,सरिता चव्हाण,कृष्णी वाळके आदि मान्यवर उपस्थित होते.आशा आरोंदेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून ऑर्चिड पुरस्कारांना मिळत असलेल्या प्रतिसादा बद्दल समाधान व्यक्त केले. पुरस्कारा दरम्यान हमारा स्कूलच्या मुलांनी बहारदार कार्यक्रम सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.