कचऱ्याचे वर्गीकरण घरातून योग्य पद्धतीने व्हायला हवे:डॉ भागवत

0
453
गोवा खबर:कचऱ्याची समस्या सुटायला हवी तर त्याची सुरुवात प्रत्येकाने घरातून करायला हवी.घरातील कचऱ्याचे सुका आणि ओला कचरा असे वर्गीकरण करून तो विल्हेवाटीसाठी नगरपालिकेकडे दिला तर सगळी प्रक्रिया सोपी होऊ शकते, असे मत सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्नेहा भागवत यांनी व्यक्त केले.
मडगाव नगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती करणाऱ्या निवासी प्रकल्पांमध्ये कचरा वर्गीकरण आणि विल्हेवाटीच्या प्रक्रिये बाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात डॉ. भागवत बोलत होत्या.यावेळी मडगावचे आमदार तथा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत,मुख्याधिकारी अजित पंचवाडकर,नगरसेवक जाफर गुदानी यांच्यासह 14 निवासी इमारतींचे प्रतिनिधी उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते कामत यांनी मडगाव नगर पालिकेच्या उपक्रमाचे स्वागत करून लोकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. सामाजिक कार्यकर्ते इ. कान्हेरो यांनी घन कचरा व्यवस्थापन कायदा 2016 बद्दल उपस्थितांना माहिती दिली.कार्यक्रमात डॉ. भागवत यांनी कचरा विल्हेवाटीच्या प्रक्रियां बद्दल माहिती दिली.लोकांकडून असेच सहकार्य मिळत राहो, अशी अपेक्षा मुख्याधिकारी पंचवाडकर यांनी व्यक्त केली.