‘ओस्सय’च्या निनादात पणजी दुमदुमली!

0
728

घुमचे कटर घुम…घुमचे कटर घुम, व ओस्सय … ओस्सय…च्या निनादात व ढोल-ताशांच्या गजरात अवघी पणजी शनिवारी सायंकाळी दुमदुमून गेली. शिमगोत्सवानिमित्त काढण्यात आलेली चित्ररथ मिरवणूक लक्षवेधी ठरली.

यंदाच्या शिमगोत्सव मिरवणुकीत  एकूण 15 हून अधिक चित्ररथ, लोकनृत्याची 8 पथके, रोमटामेळाचे 7 गट आणि वेशभूषा स्पर्धेत 34  स्पर्धक सहभागी झाले होते.