गोवा खबर:देश विदेशातील राजकारणी हॉलीवुड,बॉलीवुडचे कलाकार,उद्योगपती यांना नेहमीच गोव्याचे आकर्षण वाटत आलेले आहे.काहींनी आपली सेकंड होम गोव्यात होऊन गोंयकार बनणे पसंत केले आहे.त्यात आता आणखी सेलिब्रिटींची भर पडली आहे.आता तर जगात सर्वात ताकदवर देशाचे नेते देखील गोव्यात मुक्कामाला आले आहेत.
आश्चर्य वाटले ना? पण ही कुठलीही अफवा नाही.देश विदेशातील 26 सेलिब्रिटी आज पासून गोव्यात कायमचा मुक्काम ठोकणार आहेत.वर्षभरात आणखी 26 सेलिब्रिटी त्यांना कंपनी देण्यासाठी येथे दाखल होणार आहे.त्यामुळे यापुढे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनी सेलिब्रिटीं सोबत घेतलेल्या सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या तर भुवया ऊँचावण्याची गरज नाही.




हा सर्व दुग्धशर्करा योग जुळवून आणला आहे बेंझ अॅम्युझमेंट पार्क प्रा.ली. च्या प्रकाश दळवी यांच्यामुळे…दळवी यांच्या नातेवाईकांनी महाबळेश्वर येथे मेणाच्या पूतळ्याचे संग्रहलाय उभारले असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.तशाच पद्धतीचे संग्रहलाय गोव्यात सुरु करायचे ठरवून दळवी गेली काही वर्षे कार्यरत होते.3 महिन्या पूर्वी त्यांनी उत्तर गोव्यातील पर्यटकांसाठी हॉट स्पॉट समजल्या जात असलेल्या हडफडे येथे जागा घेऊन त्यावर बेंझ वॅक्स म्युझियम उभारले आज त्याचे केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले.
म्युझियम मधील महात्मा गांधी,बराक ओबामा,पंतप्रधान नरेंद्र मोदी,मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, मिस्टर बिन,अमीर खान, बिग बी अमिताभ बच्चन,रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्या सोबत हॉलीवुड कलाकारांचे मेणाचे पुतळे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनत आहेत.