ओथ्था सेरूप्पु 7 : इफ्फीमध्ये या चित्रपटाचा एकपात्री शो

0
586


छोटे चित्रपट प्रदर्शित करणे आव्हान असून छोट्या कॅप्सूल थिएटर्सची गरज आहे-दिग्दर्शक आर. पार्थीबन

 

 

गोवा खबर:दोन तासांच्या कालावधी असलेल्या चित्रपटांसाठी एकच व्यक्ती पटकथा, दिग्दर्शन, निर्मिती आणि वितरण करते अशी कल्पना करा आणि तीच व्यक्ती पडद्यावरही दिसत असेल तर आर. पार्थीबन यांनी ‘ओथ्था सेरूप्पु 7’ (सिंगल साईज स्लिपर 7) हा तामिळ भाषेतील एकपात्री चित्रपट तयार केला असून 50 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपट रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

 

इफ्फीमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना आर. पार्थीबन यांनी ओथ्था सेरूप्पु 7 या प्रायोगिक चित्रपटाची माहिती दिली. 500 चौ. फूट जागेत चित्रीत झालेला हा रहस्यमय चित्रपट आहे. एक वर्षापूर्वी तामिळनाडूत झालेल्या एका हत्येवर आधारित हा चित्रपट आहे, असे ते म्हणाले. एकाच व्यक्तीने लिहिलेला, दिग्दर्शित केलेला आणि अभिनय केल्याचा विक्रम या चित्रपटाच्या नावावर आहे. अशा प्रकारचा चित्रपट बनवण्यासाठी आपल्याला 15 वर्ष लागल्याचे ते म्हणाले. या चित्रपटात ध्वनीचा वापर महत्वाची भूमिका निभावतो. अनेक पात्र दिसत नाहीत मात्रा आवाजाच्या माध्यमातून ते असल्याचा आभास होतो. तांत्रिकदृष्ट्या चित्रपट परिपूर्ण बनवण्यासाठी रसूल पुकूट्टी यांची मदत घेतल्याचे त्यांनी सांगितले.

देशातल्या श्रीमंत-गरीबांमधली दरी तसेच मध्यमवर्गीय लोकांच्या आयुष्यावर अर्थव्यवस्थेचा कसा विपरित परिणाम होत आहे हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले.

अशा प्रकारचे छोटे प्रायोगिक चित्रपट प्रदर्शित करणे हे अलिकडे प्रत्येकासाठी मोठे आव्हान बनले आहे. अशा छोट्या चित्रपटांसाठी वित्त पुरवठा करायला कुणीही तयार नसते. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी सरकारने छोटी कॅप्सूल थिएटर्सने निर्माण करावीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.