ओडिशाच्या पर्यटकास गांजा बाळगल्या प्रकरणी कळंगुट मध्ये अटक

0
950
कळंगुट पोलिसांनी ड्रग्स विरोधातील आपली धडक मोहीम सुरु ठेवत ओडिशा येथील पर्यटकाला 9 हजार 300 रूपयांचा गांजा बाळगल्या प्रकरणी  अटक केली.
कळंगुट पोलिसांना खात्रीशीर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कळंगुट पार्किग परिसरात 18 सप्टेंबरच्या मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.
कळंगुटचे पोलिस निरीक्षक जीवबा  दळवी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश नाईक, पोलिस उपनिरीक्षक पराजीत मांद्रेकर,कॉन्स्टेबल दिनेश मोरजकर,गोविंद शिरोडकर आणि आपा कदम यांच्या पथकाने सापळा रचून ओडिशा येथील अनिल कुमार स्वाइन या 37 वर्षीय युवकाला 9 हजार 300 रूपयांचा गांजा बाळगल्या प्रकरणी अटक केली.