ऑर्ब एनर्जीने गोमंतक आयुर्वेद महाविद्यालयात उभारली गोव्यातील पहिली रुफटॉप सोलर सिस्टीम

0
3385

ऑर्ब एनर्जीने गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय संस्थेसाठी ग्रीडशी जोडलेली पहिली रुफटॉप सोलर सिस्टीम गोव्यामधे पूर्ण केली आहे.

३० किलोवॅटची ही रुफटॉप सोलर सिस्टीम प्रति वर्ष रु. १.५ लाख बचत करतानाच ४ वर्षे ८ महिन्यात परतफेड करील असे अपेक्षित आहे
गोवा खबर: ऑर्ब एनर्जीने (“ऑर्ब”) आज असे जाहीर केले की आयुर्वेदामधे दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने १९९३ मधे स्थापन झालेल्या गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय आणि संशोधन केंद्रामधे ३० किलोवॅटच्या रुफटॉप सोलर सिस्टीमची यशस्वीपणे उभारणी करुन ती कार्यान्वित केली आहे. ऑर्बची ही रुफटॉप सोलर सिस्टीम प्रति वर्ष सुमारे ५० हजार एकक स्वच्छ वीजनिर्मिती करेल, ज्यामुळे संस्थेला वीजेवरील खर्चामधे मोठ्या प्रमाणात बचत करण्यास सहाय्य होणार आहे.
“गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय आणि संशोधन केंद्राने आपल्या ३० किलोवॅट रुफटॉप सोलार सिस्टीमची संरचना, पुरवठा आणि उभारणी करण्यासाठी ऑर्बची निवड केली याचा आम्हाला अत्यानंद होत आहे. गोवा शासनाचे नेट मिटरींग धोरण कार्यान्वित झाल्यापासून ही पहिलीच रुफटॉप सोलर सिस्टीम आहे असेही आम्ही अभिमानाने जाहीर करत आहोत.” असे प्रतिपादन ऑर्बचे प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री. डॅमियन मिलर यांनी केले.
घरगुती, औद्योगिक आणि शैक्षणिक उपभोक्त्यांना ऑर्बची रुफटॉप सोलर सिस्टीम कोणत्याही अर्थसहाय्याशिवाय तीन ते चार वर्षांचा परतफेड कालावधी देऊ करते, जो अर्थसहाय्य नसलेल्या एका सोलर पॉवर सिस्टीमवरील गुंतवणूकीवर याआधी कधीही न मिळालेला परतावा आहे. कारण भारतातील अनेक व्यावसायिक आणि शैक्षणिक संस्थांना अर्थसहाय्याने रुफटॉप सोलार सिस्टीम परवडू शकत असल्याने, परतफेड कालावधीशी जुळणारे अप्रत्यक्ष मोफत सौर कर्ज ऑर्ब देऊ करत आहे, आणि या परतफेड कालावधीनंतर ग्राहकांच्या सोलर सिस्टीमपासून निर्मित सर्व ऊर्जा ही परिणामकारकपणे मोफत असेल.
“शिक्षण आणि आरोग्य यातील गुंतवणूकीमुळे भारताचे परिवर्तन एका विकसीत राष्ट्रामधे होऊ शकेल या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. सर्वोत्तम अश्या अध्यापन आणि वैद्यकीय अनुभवांद्वारे आपल्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदातील अद्वितीय शैक्षणिक अनुभव देण्यास गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय आणि संशोधन केंद्र कटीबद्ध आहे. संस्थेच्या या उद्देशपूर्तीसाठी आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता यावे यासाठी, आमच्या कार्यातील खर्चामधे बचत करणे हे आमच्यासाठी महत्वाचे आहे आणि ते साध्य करण्यासाठी वीजेवरील खर्चात कपात करणे व हरित ऊर्जेस सहाय्य करणे हा एक मार्ग आहे. ऑर्बचे मनापासून धन्यवाद, कारण सद्यस्थितीत सरासरी प्रति वर्ष साधारणपणे ५०,४०० एकक स्वच्छ सौर वीजनिर्मितीची तसेच प्रति वर्ष रुपये १.५ लाख वीजखर्चामधील बचतीची आम्हाला अपेक्षा आहे.” असे गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय आणि संशोधन केंद्राचे अध्यक्ष श्री. पी. के. घाटे म्हणाले.
भारतातील बेंगालुरुमधे आपल्या सोलार पॅनल्सच्या श्रेणीचे उत्पादन करणारी ऑर्ब ही रुफटॉप सोलर उपायांची व्हर्टीकली इंटीग्रेटेड पुरवठादार आहे आणि व्यावसायिक, औद्योगिक व शैक्षणिक ग्राहकांना रुफटॉप सोलार सिस्टीम खरेदीसाठी ईन-हाऊस अर्थसहाय्यही देऊ करते.