ऑनलाईन फार्मसी विरोधात 28 रोजी फार्मसी बंद

0
917

गोवा खबर:केंद्र सरकारने ई फार्मसी व ऑनलाईन फार्मसीला कायदेशिर करण्यासाठी परवानगी rदिल्याने ‘ऑल इंडिया आर्गनाईझेशन ऑफ कॅमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट (एआयओसीडी) व कॅमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट असोसिएशन गोवा (सीडीएजी)या संघटनांनी शुक्रवार 28 सप्टेंबर रोजी एक दिवस औषधालये बंद ठेवणार आहे. सर्वांनी याला पाठींबा देऊन सहकार्य करावे असे यावेळी सीडीएजीचे अध्यक अर्ल्बट डिसा यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

लोकांची गैरसोय होऊ नये तसेच आपत्कालीन सेवेवेळी औषधे मिळावी यासाठी  राज्यातील सर्व सरकारी इस्पितळातील औषधालये खुली असणार आहे. रुग्णांना आपली आवश्यक अशी औषधे आताच खरेदी करुन ठेवावी असे आवाहन यावेळी या संघटनेतर्पे करण्यात आले आहे. यावेळी या संघटनेचे सहसचिव लिंडोन डिसिल्वा, खजिनदार अमित कामत उपस्थित होते.लोकांना ताबडतोब औषधांची गरज आहे अशा वेळी लोक बाजारात जाऊन औषधे खरेदी करतात. जर ऑनलाईन मागविली तर ती 2 ते 3 दिवसात उपलब्ध होतात तसेच ती कायदेशीरही नसतात त्यामुळे लोकांनी अशी औषधे खरेदी करु नये, असे या संघटनेचे माजी अध्यक्ष प्रसाद तांबा यांनी सांगितले.