ऑगस्ट महिन्याचा रेशन कोटा

0
269

 गोवा खबर:ऑगस्ट महिन्यात अंत्योदय अन्न योजनेच्या कार्डधारकांना ३ रूपये दराने ३५ किलो तांदूळ अधिक प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेखाली प्रतिमाणसी ५ किलो तांदूळ मोफत वितरीत करण्यात येईल. 

प्राधान्यक्रम कुटुंबांना ३ रूपये दराने प्रती लाभधारक ५ किलो तांदूळ अधिक प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेखाली ५ किलो तांदूळ प्रतिलाभधारक मोफत वितरीत करण्यात येईल.

एपीएल कार्डधारकांना प्रतिकार्ड १० किलो तांदूळ १२.५० रूपये दराने आणि ६ किलो गहू १० रूपये दराने देण्यात येईल. अन्नपूर्णा कार्डधारकांना प्रतिकार्ड १० किलो तांदूळ मोफत देण्यात येईल. कल्याणकारी संस्थांना कोट्याप्रमाणे १५ किलो तांदूळ ६.१५ रूपये दराने आणि १५ किलो गहू ४.८० रूपये दराने  देण्यात येईल.

स्वस्त धान्य दुकानदारांनी ३१ जुलै २०२० पर्यंत आपला कोटा उचलून कार्डधारकांना वितरीत करावा. धान्य कोटा उचलण्यास मुदत वाढ देण्यात येणार नाही.

कार्डधारकांची रेशनवरील धान्यासंबंधी कोणतीही तक्रार असल्यास संबंधित मामलेदार कार्यालयांत किंवा नागरीपूरवठा खाते जुन्ता हाऊस पणजी येथे ती सादर करावी. तसेच मोफत मिळणा-या धान्यास आग्रह करावा.

तालुकावार संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे पेडणे-२२०१७००, बार्देश-२२६६७२०, तिसवाडी-२२२०२२५, डिचोली, २३६०५००, सत्तरी-२३७४९००, फोंडा-२३१९३४१, सासष्टी-२७२५०९९, मुरगांव-२५००५५०, केपे-२६६२५००, काणकोण-२६४४४२५, सांगे-२६०४०९०, धारबांदोडा-२६१४०२१. हेल्पलाईन क्रमांक- १९६७, १८००२३३००२२.