ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणारे मृत्यू भाजप सरकारने गालिच्याखाली दाबले: आप

0
152
गोवा खबर:गोव्यातील कोविड इस्पितळात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेल्या मृत्यूचा मुद्या दफन करुन देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आम आदमी पक्षाने भारतीय जनता पक्षावर टिकास्त्र सोडले. या गुन्हेगारी दुर्लक्षाचे “राजकीय व्यवस्थापन”केल्याचा आरोप करत आपचे प्रवक्ते वाल्मिकी नाईक म्हणाले की, सावंत आणि मोदी या दोघांकडून या मोठ्या प्रमाणात झालेल्या अपयशाचे राजकीय पडसाद कमी करण्यासाठी भाजपने सरकारने अधिकाऱ्यांशी सक्रियपणे संपर्क साधला आहे.
ऑक्सिजनचे संकट हे मोदी सरकार, ऑक्सिजन पुरवण्यात अयशस्वी झाल्याने आणि सावंत सरकारने एसओएस वाढवण्यास नकार दिल्यामुळे निर्माण झाले, नाईक म्हणाले. संकटे सोडविण्यासाठी दोन्ही सरकारांनी समन्वय साधला पाहिजे होता, असे सांगून नाईक म्हणाले की, १४ मे रोजी जेव्हा ऑक्सिजन कमतरतेमुळे होणाऱ्या मृत्यूचे संकट शिगेला आले होते,तेव्हा मुख्यमंत्री सावंत आणि आयुष मंत्री श्रीपाद नाईक भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीला उपस्थित होते.
“राज्य व केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत ऑक्सिजनच्या विषयावर काम करण्याऐवजी राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे ज्येष्ठ खासदार आणि केंद्रीय मंत्री हे दोघेही भाजप नेत्यांसमवेत पक्ष कार्यालयात होते. राजकीय पडसाद कसे व्यवस्थापित करायचे, दोष कसे कमी करायचे आणि लोकांचे लक्ष कसे विचलित करावे याबद्दल त्यांनी फक्त चर्चा केली.आपण पाहिले की, जीएमसी येथील ऑक्सिजन कमतरतेची चौकशी करण्यासाठी-सदस्यांच्या पॅनेलने काही पावले उचलली जात आहेत अशी बतावणी दर्शविली. ही समिती तीन दिवसांत त्यांचे निष्कर्ष देणार होती, परंतु एका महिन्यानंतरही कुणालाही तो अहवाल दिसला नाही. याव्यतिरिक्त, मुख्यमंत्री सावंत आणि एच.एम. राणे यांच्यातील संघर्ष वाढविण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले, जेणेकरुन ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेल्या मृत्यूऐवजी या नाटकाकडे मुख्य बातम्या वळवल्या जाव्यात. ”, नाईक म्हणाले.
डिचोली औद्योगिक वसाहतीतून स्वतःची २०,००० लिटर ऑक्सिजन साठवण टाकी दान करणार्‍या खासगी कंपनीने वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे दिवस चालून गेला, अन्यथा सरकारच्या अक्षमतेमुळे अधिक लोकांचा मृत्यू झाला असता.
नाईक म्हणाले की, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेल्या मृत्यूचा विषय भाजप केवळ गोव्यातच नाही तर देशभर दफन करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे नाईक म्हणाले.
“दोन आठवड्यांपूर्वी, दिल्ली सरकारने दिल्ली रुग्णालयात ऑक्सिजन कमतरतेमुळे होणाऱ्या मृत्यूच्या ऑडिटसाठी 6 डॉक्टरांच्या स्वतंत्र पॅनेलची स्थापना करण्यास मान्यता देण्यासाठी उपराज्यपाल यांना फाईल पाठविली, जेणेकरून त्यांना अतिरिक्त नुकसान भरपाई देण्यात येईल.मात्र, कालच केंद्र शासनाने हा प्रस्ताव फेटाळला आहे. हे सिद्ध करते की, मोदी सरकारला काहीतरी लपवायचे आहे ”.
नाईक यांनी उत्तरदायित्व निश्चित केले पाहिजे अशी मागणी केली, तसेच ऑक्सिजन कमतरतेमुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना अतिरिक्त मदत देखील केली पाहिजे,असेही ते म्हणाले. खाजगी रूग्णालयात नोंद न झालेल्या 74 कोविड मृत्यूंबाबत न्यायालयीन समिती नेमण्याच्या आपल्या मागच्या मागणीचीही नाईक यांनी पुनरावृत्ती केली, कारण यापैकी काही ऑक्सिजन कमतरतेच्या मुद्द्यांशीही संबंधित असू शकतात.