ऑक्टोबर २०२० च्या रस्त्यावरील अपघातांची आकडेवारी

0
156

गोवा खबर : वाहतूक संचालनालयाव्दारे ऑक्टोबर २०२० महिन्यात झालेल्या अपघातांचा आणि जारी केलेल्या चलन पावत्यांचा अहवाल देण्यात आला आहे.

अहवालानूसार १८५ रस्त्यावरील अपघात झाले (उत्तर गोवा ७४ आणि दक्षिण गोवा १११) ज्यात १८ प्राणघातक अपघात (उत्तर  गोवा ८ आणि दक्षिण गोवा १०) ८ गंभीर अपघात (उत्तर गोवा ३ आणि दक्षिण गोवा ५) ४८ किरकोळ अपघात (उत्तर गोवा ८ आणि दक्षिण गोवा ४०) आणि १११ विना दुखापत (उत्तर गोवा ५५ आणि दक्षिण गोवा ५६) यांचा समावेश आहे.

 रस्त्यावरील अपघातात एकूण १९ जणांना आपला प्राण गमवावा लागला (उत्तर गोवा ९ आणि दक्षिण गोवा १०) १३ चालक, ४  मागे बसलेले आणि २ पादचाऱ्यांना प्राण गमवावा लागला.

१२ जणांचा गंभीर अपघात झाला (उत्तर गोवा ६ आणि दक्षिण गोवा ६) तर ६८ व्यक्तींना किरकोळ जखमा झाल्या (उत्तर गोवा १३ आणि दक्षिण गोवा ५५).ऑक्टोबर २०२० च्या महिन्यात वाहतूक अधिकाऱ्यांकडून  एकूण ५५६ चलने देण्यात आली.