एशियन ओशीअनियन स्टॅंडर्ड  सेटर्स ग्रुपच्या अध्यक्षपदी आयसीएआयचे चार्टर्ड अकाऊंटट डॉ.झावरे

0
1010

गोवा खबर: चार्टर्ड अकाऊंटट डॉ. एस बी झावरे, द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटटस ऑफ इंडिया (आयसीएआय) चे माजी कौन्सिल सदस्य आणि आकाउंटिंग बोर्ड ऑफ आयसीएआयचे माजी अध्यक्ष हे नामांकित असणाऱ्या एशियन ओशीअनियन स्टॅंडर्ड – सेंटर्स ग्रुपच्या (एओएसएसजी) अध्यक्षपदी (2019-21)या दोन वर्षांच्या कालावधीसाठी निवडून आले.

याच बैठकीत द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटट ऑफ श्रीलंकाचे निशान फर्नांडो एओएसएसजीच्या उपाध्यक्षपदी दोन वर्षांच्या कालावधीसाठी निवडून आले.

मंगळवारी सकाळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या एओएसएसजीच्या 11 व्या वार्षिक बैठकीत आशियाई-ओशियन प्रदेशातील 20 क्षेत्रामधील 61 आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा सहभाग नोंदवला.

मंगळवारी शहरातील पत्रकारांशी बोलताना झावरे म्हणाले, “एओएसएसजीचे अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती आंतरराष्ट्रीय वित्तीय अहवाल मानदंड (आयएफआरएस) म्हणजेच इंटरनॅशनल   फायनान्शियल रिपोर्टिंग स्टॅण्डर्ड्सच्या स्थापना प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्यासाठी आयसीएआयच्या वचनबद्धतेच्या दिशेने एक पाऊल आहे आशिया आणि ओशनिक प्रदेशात आणि जगभरात राष्ट्रीय स्टॅंडर्ड निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत.

झावरे यांच्या म्हणण्यानुसार, एओएसजीने लेखा पद्धती (अकौंटिंग प्रॅक्टिस) सुधारण्यासाठी, आर्थिक अहवालाची गुणवत्ता वाढविणे आणि सीमापार व्यापार, गुंतवणूक आणि या क्षेत्रातील प्रशासन नियमित करण्यासाठी सरकार, रेग्युलेटर्स आणि इतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय संस्थांशी संबंध प्रस्थापित करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.

झावरे म्हणाले की, ते स्वतः आणि उपाध्यक्ष  फर्नांडो हे दोघांसह आठ सदस्यांची सल्लागार समिती आणि विशिष्ट तांत्रिक विषयांवर गट करून काम करतील.

तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय बैठकीत सुइ लॉयड, उपाध्यक्ष, आंतरराष्ट्रीय लेखा मानक मंडळाचे (आयएएसबी), आयएएसबीचे प्रमुख प्रतिनिधी, मंडळाचे सदस्य आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय अहवाल मानकांचे संचालक (आयएफआरएस) उपस्थित होते.

चार्टर्ड अकाउंटंट्स, आयसीएआयचे अध्यक्ष प्रफुल्ल छाजेड आणि आयसीएआयचे उपाध्यक्ष अतुलकुमार गुप्ता यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सतून प्रतिनिधींचे स्वागत केले आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना या उपक्रमात दर्जेदार आंतरराष्ट्रीय वित्तीय अहवालासाठी उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले. आयएफआरएस फाउंडेशनचे विश्वस्त विनोद राय यांनीही बैठकीला व्हिडिओतुन भाषण केले.