एलआयसीकडून सात ऑगस्ट रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन

0
1057

भारतीय जीवन आयुर्विमा महामंडळ, गोवा विभाग हिरकमहोत्सवी वर्ष साजरा करत आहे. हिरक महोत्सवानिमित्त सोमवार, 7 ऑगस्ट रोजी कला अकादमी येथील दिनानाथ मंगेशकर सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आकाशवाणी पणजी केंद्राचे माजी केंद्र संचालक आणि गोवा कोकणी अकादमीचे माजी अध्यक्ष माधव बोरकर यांच्या हस्ते संध्याकाळी साडेपाच वाजता कार्यक्रमाचे उदघाटन होणार आहे. याप्रसंगी एलआयसीचे कार्यकारी संचालक (पी&जीएस) टी. आर. मेंडरीट्टा उपस्थित असणार आहेत.