एलआयसीकडून ‘जीवन अमर’ पॉलिसी चा आरंभ

0
925

 गोवा खबर:एलआयसीच्या ‘जीवन अमर’ या नवीन टर्म इन्सूरन्स पॉलिसीचा एलआयसीचे अध्यक्ष एम. आर. कुमार यांच्या हस्ते आरंभ करण्यात आला. जी’वन अमर’ ही पॉलीसी नॉन-लिंक्ड, नफ्याशिवाय, पूर्णतः संरक्षण कवच देणारी आणि ऑफलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहे. पॉलिसीधारकांना ‘लेवल सम ऍश्युरडची’ सुविधा देण्यात आली आहे.  

18 ते 65 वयोगटासाठी ही पॉलिसी असून पॉलिसी मॅच्युरिटीची कमाल वयोमर्यादा ८० वर्षे आहे. पॉलिसीची टर्म 10 ते40 वर्षांपर्यंत आहे.

या पॉलिसीअंतर्गत धुम्रपान करणारे आणि धुम्रपान न करणारे अशी वर्गवारी करण्यात आली आहे. तसेच महिला पॉलिसीधारकांना कमी प्रिमिअम रेटस ठेवण्यात आले आहेत.

या पॉलिसीअंतर्गत कमाल रक्कम मर्यादा नसून किमान मर्यादा रक्कम 25 लाख आहे. पॉलिसीधारकांना सिंगल, रेग्यूलर, मर्यादीत प्रिमिअमर पेमेंटची सुविधा देण्यात आली आहे. पूर्ण रक्कम भरुन किंवा हफ्त्यांमध्ये रक्कम भरण्याची सुविधा आहे. अपघाती मृत्यूसाठीसुद्धा ‘जीवन अमर’ पॉलिसीअंतर्गत ऐच्छिक अतिरिक्त संरक्षण देण्यात आले आहे.