एलआयसीकडून चुकीच्या वृत्ताचे खंडन

0
796

गोवा खबर:गेल्या काही दिवसांपासून व्हॉटसऍप आणि इतर समाजमाध्यमातून भारतीय जीवन आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे. एलआयसीची आर्थिक परिस्थिती बिघडल्याची माहिती चुकीची आहे, असे एलआयसीकडून कळवण्यात आले आहे. एलआयसीची प्रतिमा डागाळण्याचा हा प्रयत्न आहे.  

एलआयसी या बनावट वृत्ताचे खंडन करत आहे तसेच पॉलीसीधारकांनी या चुकीच्या माहितीला बळी पडू नये, असे आवाहन एलआयसीने केले आहे. एलआयसीने 2018-19 या आर्थिक वर्षात पॉलीसीधारकांसाठी 50000 कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला आहे, जो आतापर्यंतचा सर्वोच्च आहे. 31 ऑगस्ट 2019 पर्यंत एलआयसीचा पॉलिसी बाजारातील वाटा 72.84% आहे आणि पहिल्या वर्षासाठीचा प्रिमिअम 73.06% एवढा आहे. एलआयसीचा बाजारातील वाटा मार्चमध्ये 66.24% होता तो ऑगस्ट अखेरीपर्यंत 73.06% एवढा झाला आहे.