एयरबीएनबी साजरी करत आहे, लोकशक्ती ‘दॅट्स वाय वी एयरबीएनबी’सह होस्ट्स, इन्फ्लुअन्सर्स आणि पर्यटकांनी एयरबीएनसह शेयर केली त्यांची कहाणी

0
1350

 

 

 गोवा खब: एयरबीएनबीने आज आपले नुकतेच तयार करण्यात आलेले अभियान ‘दॅट्स वाय वी एयरबीएनबी’चे लाँच साजरे केले, ज्यामध्ये होस्ट, पर्यटक आणि इनफ्लुअन्सर्स यांनी त्यांचे वैयक्तिक पर्यटन अनुभव व्यक्त केले. एयरबीएनबी ब्रँडचा मित्रपरिवार – मंदिरा बेदी, हुमा कुरेशी आणि लेखक, फोटोग्राफर व गोव्यातील पर्यटन प्रेमी नोलन मस्कारेहान्स हे ही या अभियानाच्या हिरोंसोबत सहभागी झाले होते.

 

एयरबीएनबीचे हे नवे अभियान वैयक्तिक आनंद आणि लोकांना पर्यटनाविषयी वाटणारे प्रेम साजरे करणारे आहे.ज्या ठिकाणी जाऊ, तिथलेच होऊन जाऊ… ही भावना तयार करण्यासाठी बांधील असलेलं दॅट्स व्हाय वी एयरबीएनबी अभियान अस्सल पर्यटकांनी जगभरात एयरबीएनबीच्या मदतीने अनुभवलेल्या सुट्टीच्या गोष्टी कथन करणारं आहे.

 

ब्रँडच्या दोन फिल्म्सपैकी एकामध्ये मालविका आणि करूणा यांनी बर्लिनमध्ये अनुभवलेलं साहस पाहायला मिळतं, तर दुसऱ्यामध्ये गोवंडेस कुटुंबाने गोव्यासारख्या एयरबीएनबीच्या भारतातील सर्वाधिक वेगाने वाढत असलेल्या बाजारपेठेत साजरी केलेली सुट्टी पाहायला मिळते. या गोष्टींमागची संकल्पना ‘माझ्यासारखी व्यक्ती’ कशाप्रकारे प्रवासादरम्यान एयरबीएनबीचा खास अनुभव घेऊ शकते हे स्पष्ट करणारी आहे. घरासारख्या जागेमध्ये अनुभवायला मिळणारी सहजता आणि सुरक्षितता या प्रवाशांना त्यांचे खासगीपण उठावदारपणे मांडण्यास आणि कोणत्याही बंधनांशिवाय आपल्या आवडीप्रमाणे हवं ते निवडण्याची मुभा देते.

 

याप्रसंगी एयरबीएनबी इंडियाचे देश व्यवस्थापक अमनप्रीत बजाज म्हणाले, ‘‘दॅट्स वाय वी एयरबीएनबी हे आमचे नवे अभियान पर्यटनातून स्वतःला व्यक्त करणाऱ्या प्रत्येकाला समर्पित आहे. मग, ते सुट्टीवरही आपल्या घराची ऊब मिळवून देणाऱ्या घरात राहून एकमेकांतलं नातं दृढ करणारं कुटुंब असतो किंवा पर्यटनाला पूर्णत्व देण्यासाठी एयरबीएनबी एक्सपिरीयन्सेसची कास धरणारं एखादं जोडपं असो किंवा नव्या शहरात, नव्या स्थानिकांच्या मदतीने स्वतःचा नव्याने शोध घेणारी एखादी व्यक्ती असो – प्रत्येकासाठी त्याचा वेगळा अर्थ असतो. होस्टसाठी ही त्यांचं शहर पर्यटकांना दाखवण्याची आणि टिकाऊ उत्पन्न मिळवण्याची संधी असते. एयरबीएनबीचे हेच सौंदर्य आहे, की होस्ट शहरातल्या त्याच्या घरात राहू शकतो आणि त्याच्या पॅशनचा पाठपुरावा करत उत्पन्न मिळवू शकतो.

 

“माझ्यासाठी प्रवास म्हणजे स्वतःवर प्रेम करणं, फक्त काही क्षणांच्या माध्यमातून स्वतःचा नव्याने समतोल साधत मनाला शांत करणं. मी माझ्या करियरमध्ये खूप व्यग्र असते आणि त्यामुळे त्यातून थोडा वेळ मिळाला, की मी फक्त आणि फक्त माझं मन जे सांगतं तेच ऐकण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे आहे हे मला फार आवडतं. मग, ते बाहेर फिरणं असो किंवा स्वतःचा नाश्ता स्वतः तयार करण्याची सोय असो – मी कुठेही असले, तरी आपल्या घरात असल्याची भावना अनुभवणं फार छान असतं,” असे अभिनेत्री हुमा कुरेशी म्हणाली.

 

पर्यटनाविषयी आपलं प्रेम व्यक्त करत अभिनेत्री मंदिरा बेदी म्हणाली, आपल्यासाठी पर्यटन म्हणजे काय याचा विचार करते, तेव्हा माझ्या मनात फक्त स्वतःला शांतावणारी भावना उमटते. पर्यटन म्हटलं, की कायम मला स्वातंत्र्य आठवतं. मला अज्ञाताचं आकर्षण आहे आणि नव्या संस्कृतीमध्ये स्वतःला रममाण करणं मला फार आवडतं. नवं काहीतरी आजमावताना मी कधीच घाबरत नाही, तरी कुठेही असताना मला सुरक्षित आणि परिचयाची भावना जास्त पसंत असते. दॅट्स व्हाय आय एयरबीएनबी.

 

उद्यमशील होस्ट आणि निष्ठावा पर्यटकांमुळे एयरबीएनबीचा लोकसमाज त्याच्या दोन्ही भागधारकांना समृद्धी मिळवून देत आहे. एयरबीएनबी समाज विस्तारत असतानाच त्याद्वारे हॉस्पिटॅलिटी उद्योजकांना केवळ त्यांच्या घराचा वापर करून लक्षणीय आर्थिक फायदा मिळवण्यास सक्षम केले जात आहे. एम्प्टी नेस्टर्सपासून सिंगल पेरेंट्सपर्यंत आणि तरुण होस्ट्सपासून वापरात नसलेल्या घरांच्या मालकांपर्यंत, एयरबीएनबीने देशभरात कित्येक लघुउद्योजक तयार केले आहेत.

 

 

एयरबीएनबीबद्दल

२००८ मध्ये स्थापन झालेले एयरबीएनबी ही जागतिक पर्यटन कम्युनिटी आहे, जी राहायचे ते ठिकाण, त्या ठिकाणी जाऊन काय करायचे व कोणाला भेटायचे अशा सर्व गोष्टींचा समावेश असलेल्या सहली उपलब्ध करते. एयरबीएनबीमध्ये तंत्रज्ञानाचा योग्य मेळ घालून जगभरातील लाखो लोकांना त्यांची जागा, आवड आणि गुणवत्तेचा योग्य वापर करून हॉस्पिटॅलिटी उद्योजक बनत आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले जाते. एयरबीएनबीची पर्यटकांना राहाण्याच्या सुविधा पुरवणारी बाजारपेठ १९१ देशांत, 1 लाख शहरांत मिळून राहाण्याच्या 6 दशलक्षांपेक्षा जास्त सुविधा पुरवते.

अनुभवांच्या मदतीने लोकांना त्या ठिकाणची वेगळी बाजू स्थानिकांनी तयार केलेल्या उपक्रमांसह, खास तयार करण्यात आलेल्या 30 हजार उपक्रमांसह, एक हजार होस्ट्सच्या माध्यमातून पाहाता येते. एयरबीएनबीचे लोकांनी लोकांसाठी तयार केलेले व्यासपीठ भागधारक, होस्ट्स, प्रवासी, कर्मचारी आणि समाजासाठी लाभदायक ठरणारे आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.airbnb.co.in