एयरबीएनबीतर्फे गोव्यात एक्सपिरीयन्सेस लाँच

0
1096

 

स्थानिक होस्ट्सच्या मदतीने होम शेअरिंग प्लॅटफॉर्मद्वारे निकोप पर्यटनाचा प्रसार

 

गोवा खबर: एयरबीएनबे आज गोव्यात, भारतातील सर्वाधिक वेगाने विस्तारत असलेल्या बाजारपेठेत एक्सपिरीयन्सेस लाँच केल्याचे जाहीर केले. यामुळे कंपनीच्या राज्यातील फुटप्रिंट्समध्ये पाच हजारांनी वाढ झाली आहे.

 

नोव्हेंबर २०१६ मध्ये लाँच झालेले एयरबीएनबी एक्सिपिरीयन्समुळे पर्यटकांना स्थानिकांनी खास तयार केलेल्या जादूई गोष्टी अनुभवता येतात आणि अभिनव ठिकाणांची मजा घेता येते. एक्सिपिरीयन्सेसमुले पर्यटकांना नेहमीच्या पर्यटन स्थळांव्यतिरिक्त समाज, ठिकाणे आणि विविध गोष्टी उपलब्ध होतात. तंत्रज्ञानाचा व्यासपीठ म्हणून वापर करत एयरबीएनबी एक्सपिरीयन्सेसने जग खुले केले आहे, लोकांना एकमेकांशी जोडले आहे आणि आंतर- सांस्कृतिक संवादाची निर्मिती केली आहे.

 

जागतिक पातळीवर एयरबीएनबीद्वारे ७३ वेगवेगळ्या देशांतील बुकर्सपासून १८० शहरांत १२ हजार एक्सपिरीयन्सेस उपलब्ध करण्यात आले आहेत. भारतात, एक्सपिरीयन्सेससाठी नवी दिल्लीनंतर गोवा ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे.

 

भारतातील सर्वाधिक वेगाने विस्तारत असलेली पर्यटन बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेले गोवा एयरबीएनबीच्या दृष्टीने खास महत्त्वाचे आहे. गेल्याच वर्षी कंपनीने राज्यातील स्थानिकांशी भागिदारी करत एयरबीएनबीचे गोवा इनसायडर गाइड तयार केले जे पर्यटकांना राहाण्यासाठी राज्यभरातील आकर्षक घरांचा पर्याय उपलब्द करून देते तसेच गोव्यात स्थानिकांप्रमाणे राहाण्यासाठी अभिनव संकल्पनाही सुचवते.

 

लाँचविषयी एयरबीएनबी ग्लोबल पब्लिक पॉलिसी अँड कम्युनिकेशनचे प्रमुख ख्रिल लेहान म्हणाले, ‘एयरबीएनबी एक्सपिरीयन्सेस प्रवास परत जादुई बनवत पर्यटकांना जगभरातील स्थानिक समाजांमध्ये मिसळून जाण्याची आणि स्थानिक तज्ज्ञांनी तयार केलेल्या व त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या अभिनव, उपक्रमांमध्ये सहभागी होता येते. गोवन नागरिकांनी स्थानिक पर्यटनात सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा, त्यांच्या आवडी, पॅशन्स इतरांशी शेअर करून अतिरिक्त उत्पन्न मिळवावे असे आम्हाला वाटते. एक्सपिरीयन्सेस हा स्थानिक नागरिकांना नव्या गोष्टी करण्यासाठीचा व नव्या लोकांना भेटण्याचा उत्तम मार्ग आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेले हे व्यासपीठ गोव्यात आणताना आम्ही अतिशय उत्सुक आहोत.’

 

पर्यटकांना गोव्यात विविध प्रकारच्या एक्सपिरीयन्सेसमधून निवड करता येईल.

 

चॅम्पबरोबर विंडसर्फ

हा एक्सपिरीयन्स डेरिक मेनेन्झेस या १५ वेळा राष्ट्रीय विंडसर्फिंग चॅम्पियन झालेल्या आणि गोव्यात वॉटर स्पोर्ट्सची संकल्पना रूजवणाऱ्या आणि १९९८ मध्ये आशियाई खेळांत गोव्याचे प्रतिनिधीत्व केलेल्या चॅम्पद्वारे उपलब्ध करून दिला जातो. या धमाल विंडसर्फिंग एक्सपिरीयन्समध्ये डेरिक डोना पावला गावातील निसर्गरम्य हवाई समुद्रकिनाऱ्यावर विंडसर्फिंगचे मूलभूत प्रशिक्षण देतो. सत्राच्या शेवटी पर्यटकांना हवेतून पुढे- मागे सर्फ करण्याइतपत आत्मविश्वास नक्कीच मिळतो.

 

पणजी शहराची चालत सहल

रामचंद्रन यांच्यातर्फे या एक्सपिरीयन्सचे आयोजन केले जाते. रामचंद्रन हे स्वतः पर्यटक आहेत आणि आपल्या मूळ गावाची ऐतिहासिक माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी सदैव उत्सुक असतात. स्थानिक कहाण्या आणि मांडवी नदीच्या काठावर वसलेल्या, गोव्याची राजधानी असलेल्या पणजी शहराच्या माहितीवर लक्ष केंद्रित करणारी ही सहल ऐतिहासिक इमारती आणि लॅटिन क्वार्टर चर्चद्वारे सुरू होते जिथे असलेला पोर्तुगीज कॉलन्यांचा प्रभाव सहजपणे पाहाता येतो. पर्यटक त्यानंतर रंगीबेरंगी, टेराकोटा टाइल्स असलेल्या, रॉट आयर्नच्या बालक्नी आणि बाकदार ऑयस्र शेल खिडक्या असलेल्या हेरिटेज इमारतींच्या गल्ल्यांतून पुढे जाण्याची मजा घेतात. हा वॉक गोव्याचा स्थानिक नाश्ता खिलवून संपते.

 

 

जुना गोवा हेरिटेज वॉक

पू गोव्यातील अतिशय प्रसिद्ध आणि पोर्तुगीज पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील जा आणि रोहन यांच्याद्वारे या एक्सपिरीयन्सचे आयोजन केले जाते. या हेरिटेज वॉकमध्ये पर्यटकांना जुन्या गोव्यातील पाच-स हा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज ठिकाणे पाहायला मिळतात. यात पर्यटकांना कोलोनियल पोर्तुगीज काळाचा इतिहास, राज्यातील कॅथलिकोइझम आणि १५ व्या शतकात मांडवी नदीवर बंदर म्हणून वसवण्यात आलेल्या जुन्या गोव्याच्या गोष्टी ऐकायला मिळतात.

 

गोवा कम्युनिटी, वैयक्तिक पातळीवर इच्छुक नागरिक, व्यावसायिक टुर गाइड्स आणि ट्रॅव्हल एजन्सीजना अभिनव आणि खास एक्सपिरीयन्सचे आयोजन करण्यासाठी https://www.airbnb.co.in/host/experiences वर विनंती अर्ज दाखल करता येईल.

 

एयरबीएनबीबद्दल

२००८ मध्ये स्थापन झालेले एयरबीएनबी ही जागतिक पर्यटन कम्युनिटी आहे, जी राहायचे ते ठिकाण, त्या ठिकाणी जाऊन काय करायचे व कोणाला भेटायचे अशा सर्व गोष्टींचा समावेश असलेल्या सहली  उपलब्ध करते. एयरबीएनहीमध्ये तंत्रज्ञानाचा योग्य मेळ घालून जगभरातील लाखो लोकांना त्यांची जागा, आवड आणि गुणवत्तेचा योग्य वापर करून हॉस्पिटॅलिटी आंत्रेप्रेन्युअर बनत आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले जाते. एयरबीएनबीची पर्यटकांना राहाण्याच्या सुविधा पुरवणारी बाजारपेठ १९१ देशांत राहाण्याच्या सुविधा पुरवते व त्यामध्ये अपार्टमेंटपासून व्हिला व किल्ले, ट्रीहाउस आणि बीअँडबीचा समावेश असतो.

एक्सपिरीयन्सेसच्या मदतीने लोकांना त्या ठिकाणची वेगळी बाजू स्थानिकांनी तयार केलेल्या उपक्रमांसह पाहाता येते, तर रेझीबरोबर झालेल्या भागिदारीमुळे निवडक देशांत सर्वोत्तम स्थानिक रेस्टॉरंट्सचे आदरातिथ्य अनुभवता येते. हे सर्व वापरण्यास अतिशय सोप्या आणि आकर्षक पद्धतीने तयार केलेल्या संकेतस्थळावर तसेच अपवर एकत्र करण्यात आले आहे.