एयरटेलच्या VoLTE नेटवर्क सेवेचे महाराष्ट्र आणि गोव्यात अनावरण

0
1125

 

पुणे: भारती एयरटेल (एयरटेल), या भारताच्या सर्वात मोठ्या
टेलिकम्युनिकेशन सेवा प्रदाता कंपनीने आज आपल्या वॉइस ओव्हर एलटीई (वोल्ट)
सेवेच्या उर्वरीत महाराष्ट्रात आणि गोव्यात परिचयाची घोषणा केली. अधिक जलद
कॉल सेट अप टाईमसह 4 जीवर चालणाऱया एअरटेलच्या VoLTE नेटवर्कमुळे
ग्राहकांना एचडी दर्जाचे व्हॉईस कॉल्स करता येणार आहेत.
एअरटेल 4 जी सीम असलेल्या सर्व प्रसिद्ध 4 जी किंवा एलटीई सज्ज मोबाईल
डिव्हाईसेसवर एअरटेल VoLTE नेटवर्क उपलब्ध होणार आहे. एअरटेल VoLTE
नेटवर्कचा वापर करून ग्राहक कोणत्याही मोबाईल क्रमांकावर किंवा लँडलाईन
क्रमांकावर संपर्क साधू शकणार आहेत. VoLTE साठी कोणताही अतिरिक्त डेटा चार्ज
लावण्यात येणार नसून कॉल्सची बिलेही आधीच्या योजनेप्रमाणे किंवा पॅक
बेनिफिट्सप्रमाणेच येतील.
एअरटेलच्या व्यापक 4 जी नेटवर्क कव्हरेजमुळे एअरटेल VoLTE नेटवर्क अन्य
कंपन्यांच्या नेटवर्कपासून उजवे ठरते. 4 जी उपलब्ध नसल्यासदेखील, एअरटेल VoLTE
नेटवर्क स्वयंचलितपणे 3 जी किंवा 2 जी नेटवर्कमध्ये रुपांतरीत होत असून यामुळे,
ग्राहक विनादिक्कत, सतत कनेक्टेड राहू शकणार आहेत. कॉल सुरू असतानाही
ग्राहकांच्या डेटा सेशनमध्ये कोणतीही बाधा येणार नाही, हे केवळ एअरटेल VoLTE
मुळे शक्य होणार आहे.
रोहित मारवा, चिफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर-महाराष्ट्र आणि गोवा, भारती एयरटेल
म्हणाले, ”महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये वोल्ट तंत्रज्ञानाची आमच्या सेवा
पोर्टफोलियोमध्ये ओळख करुन दिल्यामुळे आम्हाला हाय डेफिनिशन व्हॉइस क्वालिटी
आणि जलद गतीने कॉल सेट अप टाइम आमच्या ग्राहकांना देऊ करण्यामध्ये सक्षमता
मिळेल आणि वोल्टचा परिचय या दिशेतले महत्वाचे पाऊल आहे.”
एअरटेल VoLTE कसे मिळवाल –

1. www.airtel.in/volte तुमच्या मोबाईल डिव्हाईसची कम्पॅटिबिलीटी तपासून पहा. काही
प्रसिद्ध डिव्हाईस मॉडेल्सना VoLTE सक्षम डिव्हाईसेस म्हणून एअरटेलतर्फे प्रमाणपत्र
देण्यात आले आहे. या यादीत आणखी काही मॉडेल्सची भर पडणार आहे.
2. VoLTE ला सहाय्य करणाऱया आधुनिक व विकसित ओएसने आपले मोबाईल
डिव्हाईस अपग्रेड करून घ्या. हे अपग्रेड हॅण्डसेट उत्पादकांकडून पुरवले जातात.
3. एअरटेल 4जी सीम डिव्हाईसमध्ये बसेल, याची खात्री करून घ्या. ग्राहक
आपल्dया जवळच्या एअरटेल स्टोअरला भेट देऊन आपले 4 जी सीम अपग्रेड करू
शकतात.
4. www.airtel.in/volte सूचना पाळून VoLTE एनेबल करून घ्या.
ड्युएल सीम हॅण्डसेट असेलल्dया ग्राहकांनी डेटा सीम स्लॉट किंवा स्लॉट क्रमांक 1
मध्ये एअरटेल 4 जी सीम टाकून नेटवर्क ‘4 जी, 3 जी, 2 जी (ऑटो)’ एनेबल केले
आहे, याची खात्री करून घ्या.
एअरटेल VoLTE ला सहाय्य करणारी काही प्रसिद्ध डिव्हाईल मॉडेल्स –
iPhone SE /6 /6plus / 6S / 6S plus /7 /7 plus /8 /8 plus
Samsung A5 2017/ A7 2017/ A8/ A9 Pro/ J2 2016/ J2 Pro/ J7 2015/ J7 2016/ J7 Prime/ J7 Nxt/On 8/ On Nxt
Oppo F3, F3 plus, A71
Gionee A1/A1 Lite/X1/X1S/
Lava Z25/Z60/ Z80/ Z90
Vivo Y55L/Y66
एयरटेल महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये 2012 मध्ये 2300 मेगा हर्ट्झ टीडी एलटीइ बॅंडमध्ये 4G देऊ करणारी आणि 2017मध्ये
1800 मेगा हर्ट्झ एफडी एलटीई जोडणारी पहिली ऑपरेटर कंपनी आहे