एम्प्रेस युनिवर्स २०१८ ची महाअंतिम फेरी होणार गोव्यात

0
1888
गोवा खबर:एम्प्रेस युनिवर्स लिमिटेडचा ट्रेडमार्क असलेल्या एम्प्रेस युनिवर्स २०१८ या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेची महाअंतिम फेरी ९ डिसेंबर २०१८ रोजी चोपडे-गोवा येथील स्पॅन सुट्स अँड विला येथे होणार असल्याची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेसाठी मेंटर म्हणून अलेसिया राउत, गुडविल अम्बेसिडर आणि परीक्षक महिमा चौधरी, पल्लवी मोहन, वर्मा डिमेलो, शासकीय अधिकारी आणि नामवंत हस्ती आदी यावेळी उपस्थित होते.
एम्प्रेस युनिवर्सची राज्य स्पर्धा पुढील पाच श्रेणींमध्ये घेण्यात आली : एम्प्रेस युनिवर्स, एम्प्रेस युनिवर्स-इलेगन्स, एम्प्रेस युनिवर्स-ग्रेस, एम्प्रेस युनिवर्स-मिस, एम्प्रेस युनिवर्स-पेटाइट. या राज्य स्पर्धेतील विजेते आता जगभर होणाऱ्या एम्प्रेस युनिवर्स कंट्री स्पर्धा या तिसऱ्या फेरीमध्ये सहभागी होणार आहेत.
ऑस्ट्रेलिया, अमेरिका, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, स्वीडन, स्वित्झर्लंड, संयुक्त अरब अमिरात आदी देशांमध्ये राज्य स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच भारतामधून गोवा, पंजाब, दिल्ली-एनसीआर, हरियाना, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, राजस्थान आदी राज्यांमधील फेऱ्यांमधील विजेते राष्ट्रीय फेरीसाठी निवडण्यात आले.
सौंदर्य स्पर्धा ही एक पारंपरिक ओळख असली तरी एम्प्रेस युनिवर्सची संकल्पना जगभरातील महत्त्वाकांक्षी, आत्मविशअवासू महिलांना एका व्यासपीठावर आणणे आणि एकत्रितपणे व्यक्तिगत पातळीवर तसेच महिलेच्या सभोवतालच्या जगात सकारात्मक बदल घडवणे अशी आहे.
४ डिसेंबर २०१८ पासून सुरू होणाऱ्या एम्प्रेस युनिवर्सच्या महाअंतिम फेरीसाठी सर्व देशांमधील निवडलेल्या राष्ट्रीय विजेत्यांना गोव्यामध्ये ६ रात्री आणि ७ दिवस लक्झरी लाइफस्टाइल सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. याबाबत भारतातील प्रवक्त्या आणि संस्थापक शेली माहेश्र्वरी गुप्ता म्हणाल्या, “प्रेक्षकांची मोठी गर्दी, प्रसारमाध्यमांकडून थेट प्रक्षेपण अशा रूपात एक भव्य सोहळा गोव्यात सादर होईल असा आम्हाला विश्वास आहे.”
उंची, वय, वैवाहिक स्थिती अशी कोणतीही बंधनाची चौकट नसलेल्या या एम्प्रेस युनिवर्स सौंदर्य स्पर्धेमध्ये जगभरातील सौंदर्यवतींना सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन मिळते. महत्त्वाचे म्हणजे आपले विचार जगाने ऐकावे यासाठी ही स्पर्धा म्हणजे सर्वोत्तम व्यासपीठ आहे. तसेच सामाजिक कार्य आणि महिला सक्षमीकरणासाठी काम करू इच्छिणाऱ्या महिलांना पाठबळ देण्यासाठी व्यासपीठ देण्याचा उद्देशही या स्पर्धेमागे आहे.