एमव्ही नुशी नलिनी बोटीपासून १ किमि अंतरावरून सुरक्षितपणे वाहतूक करा: नाविकांना सूचना

0
509

गोवा खबर:दोनापावल जवळ समुद्रात अडकून पडलेल्या एमव्ही नुशी नलिनी बोटीतील नाफ्ता, हायस्पीड डिजेल आणि अवजड तेल काढण्याचे काम चालू असताना कोणताच अडथळा येऊ नये म्हणून मांडवी आणि जुवारी नदीतून वाहतूक करणाऱ्या  बार्जेस, प्रवाशी लॉच, फेरी बोट, मच्छिमारी बोटी आणि यांत्रिक व बिन यात्रिक बोटी, पर्यटक बोट, क्रुझ बोटीच्या मालक आणि चालकांनी या बोटीपासून १ कि. मिटर अंतरावरून सुरक्षित आणि सावकाशपणे वाहतूक करावी असे बंदर खात्याने कळविले आहे.