एबीपी न्यूजचा बेस्ट गोवा ब्रैंड गोवा पर्यटनला, पर्यटनमंत्र्यांनी स्वीकारला पुरस्कार

0
1262

गोवा खबर:गोव्यात येणाऱ्या देशी आणि विदेशी पर्यटकांसाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून गोव्यातील पर्यटनाला जागतिक पातळीवर नेल्या बद्दल एबीपी न्यूजचा बेस्ट गोवा ब्रैंड पुरस्कार गोवा पर्यटनने पटकावला. पणजी येथे आज पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात उपमुख्यमंत्री तथा पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

गोव्यात येणारे पर्यटक आमच्यासाठी देवा समान आहेत.त्यांच्यासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्या बरोबरच सुरक्षेची हमी देखील सरकार घेत आलेले आहे.देश विदेशातील जवळपास 90 लाख पर्यटक दरवर्षी गोव्यात येत असतात.पर्यटकांच्या सेवेसाठी आम्ही कटिबद्ध असून गोवा पर्यटन हा जगत एक नंबरचा ब्रैंड बनावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी पुरस्कार स्वीकारल्या नंतर बोलताना सांगितले.

यावेळी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल शिरोडयाचे आमदार सुभष शिरोडकर यांचा देखील विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.याशिवाय ध्यान फाउंडेशन,आशा आरोंदेकर आणि गोवा माइल्स यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.यावेळी आरती गौर,उत्कर्ष दाभाडे,स्वाती शीलकर,अमोल आरोंदेकर आदी मान्यवर उपस्थित होते.