एफसी गोवाने ऑफलाइन टिकीट विक्रीची केली घोषणा

0
5908

 

या सिझनला आता ऑफलाइन व ऑनलाइनद्वारे करा टिकीटांची नोंदणी


गोवा खबर:
एफसी गोवाने ऑनलाइन पध्दती व्यतिरिक्त आता दोन ठिकाणांवर ऑफलाइन पद्धतीने प्री-बुकींग टिकीट नोंदणीची संधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली.

25 सप्टेंबर 2018 पासून ऑफलाइन टिकीटांची विक्री सुरु होईल. पहिले बॉक्स ऑफिस मडगाव येथील फातोर्डा स्टेडियम तर दुसरे बॉक्स ऑफिस कंपाल येथील पणजीमांड येथे असणार आहे. दररोज सकाळी 11 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत ही बॉक्स ऑफिसे खुली असणार आहेत.

एफसी गोवाच्या चाहत्यांना सोपेपणी मिळवून देण्याकरिता ऑफलाइन प्री-बुकींगच्या टिकीटांवर ऑनलाइन प्री-बुकींग टिकिट एवढीच दरांमध्ये सवलतदेखील मिळणार आहे.

 

  उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम
सामन्यादिवशीचे दर 499 499 749 999
अर्ली बर्ड दर 399 399 499 499

 

सिझन टिकीट खरेदी केल्याने चाहते स्वयंचलितपणे एलिट सदस्यता प्राप्त करतील. ही सदस्यता प्राप्त झालेल्यांना अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यात येईल. एफसी गोवाच्या एलिट सदस्यांना ‘क्यूरेटेड कन्टेट’चे व्हिडीओ व खेळाडूंचे बाइट्स पहायला मिळणार आहेत. याशिवाय त्यांना वेबसाइटवरील विशेष भाग उघडायला मिळणार आहे. याव्यतिरिक्त चाहत्यांना वैयक्तिकृत सदस्यता कार्ड मिळणार आहे व एफसी गोवाच्या संघाला भेटण्याची संधीदेखील मिळणार आहे. याचबरोबर त्यांना ते स्वयंचलितरित्या एफसी गोवाच्या निष्ठा कार्यक्रमाचा भाग देखील बनणार आहेत.