एप्रिल2018 मध्ये वस्तू आणि सेवा कराद्वारे 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल प्राप्त

0
1071

 

गोवा खबर:एप्रिल 2018 या महिन्यात वस्तू आणि सेवा कराद्वारे ढोबळ 1,03,458 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. यात सीजीएसटी (केंद्राच्या) 18,652 कोटी आणि एसजीएसटीच्या (राज्याच्या) 25,704 कोटी रुपयांचा इंटिग्रेटेड अर्थात एकात्मिक वस्तू आणि सेवा कर, आयजीएसटीद्वारे 50548 कोटी रुपये (आयातीवरच्या 21,246 कोटी रुपयांचा समावेश) तर उपकराद्वारे 8554 कोटी (आयातीवरच्या702 कोटी रुपयांचा समावेश) रुपयांचा समावेश आहे.

मार्च महिन्यासाठी 60.47 लाख जीएसटीआर 3 बी विवरणपत्रे दाखल करण्यात आली.

एप्रिल हा कंपोझिशन डिलर्सकडून तिमाही विवरणपत्र दाखल करण्याचा महिनाही होता. 19.31 लाख कंपोझिशन डिलर्सपैकी 11.47 लाख जणांनी तिमाही विवरणपत्र (जीएसटीआर-4) दाखल केले.