एप्रिल ते जून 2018 या कालावधीत देशातल्या महत्वाच्या बंदरातील मालवाहतुकीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.91 टक्के वाढ

0
1234

गोवा खबर:एप्रिल ते जून 2018 या कालावधीत देशातल्या महत्वाच्या बंदरांमधील मालवाहतुकीत गेल्या वर्षीच्या या काळाच्या तुलनेत 3.91 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी या काळात 167.48 दशलक्ष टन मालवाहतूक झाली होती. मात्र, यंदा याच कालावधीत 174.02 इतकी माल वाहतूक झाली.

यात जेएनपीटीसह कोलकाता, परादीप, विशाखापट्टणम्, कामराजार, चेन्नई, कोचीन, न्यू मँगलोर आणि कांडला म्हणजेच दीनदयाल या बंदरांचा समावेश आहे.

कामराजार बंदरावरुन सर्वाधिक मालवाहतूक झाली. त्याखालोखाल कोलकाता आणि हल्दीया, परादीप, कोचीन आणि विशाखापट्टणम समावेश आहे. यात मुख्यत: द्रव्य पदार्थ, कोळसा आणि इतर किरकोळ मालाच्या वाहतुकीत वाढ झाली आहे.

एप्रिल ते जून या कालावधीत मुंबई जवळच्या जेएनपीटी बंदरावरुन 17.37 दशलक्ष टन मालवाहतूक झाली