एनसीएओरच्या वर्धापनदिनानिमित्त राकेश शर्मा यांचे व्याख्यान

0
822

 

गोवा खबर:राष्ट्रीय अंटार्क्टीका आणि सागरी संशोधन संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त अंतराळवीर राकेश शर्मा यांचे  5 तारखेला व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. पहिले अंतराळवीर विंग कमांडर राकेश शर्मा एसी (निवृत्त) यांचे अंतराळातील भविष्य या विषयावर संस्थेच्या सभागृहात व्याख्यान होणार आहे.

 

व्याख्यानानंतर उपस्थितांना त्यांच्याशी संवादही साधण्याची संधी मिळणार आहे. संस्थेच्या वेबपेजवर नोंदणी केलेल्यांना व्याख्यानाचा लाभ मिळणार असल्याचे एनसीएओरच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.