एनएफएआयच्या ‘वुमेन इन इंडियन सिनेमा’ या पुस्तकाचे इफ्फी 2018 मधे प्रकाशन

0
1030
The Governor of Goa, Smt. Mridula Sinha and the Minister of State for Youth Affairs & Sports and Information & Broadcasting (I/C), Col. Rajyavardhan Singh Rathore releasing the book - Women in Indian Cinema, at the inauguration of the 49th International Film Festival of India (IFFI-2018), in Panaji, Goa on November 20, 2018. The Secretary, Ministry of Information & Broadcasting, Shri Amit Khare is also seen.

गोवा खबर:एनएफएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या ‘वुमेन इन इंडियन सिनेमा’ या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांच्या हस्ते 49 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या शानदार उद्‌घाटन समारंभात झाले. गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा, माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे, प्रकाशन विभागाच्या महासंचालक साधना राऊत यावेळी उपस्थित होत्या.

भारतीय चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावरचे महिलांचे योगदान या चित्रमय पुस्तकात विषद करण्यात आले आहे. मेनी बॅटल्स टू बी वोन, मिथस् बिईंग अनटोल्ड, द सोशन मॅसेंजर्स अशा विभागात महिला भूमिकांचे पैलू उलगडून दाखवण्यात आले आहेत.

समाजातले महिलांचे स्थान हा विषय भारतात अनेकदा चर्चिला जातो. भारतीय चित्रपटांनी महिला आणि स्त्रीत्व पडद्यावर कसे सादर केले आहे हे या पुस्तकाद्वारे पाहणे औत्सुक्याचे आहे असे राठोड यांनी प्रस्तावनेत म्हटले आहे.

हे पुस्तक म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीतल्या महिलांच्या कर्तृत्वाप्रती आदर भावना आहेत असे एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदुम यांनी सांगितले. प्रकाशन विभागाने प्रकाशित केलेले हे पुस्तक लवकरच विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.