एनआयसीतर्फे आरोग्य सेतू ऍप

0
870

 

गोवा खबर:एनआयसीतर्फेसुरू करण्यात आलेल्याएका ऍपद्वारे कोविड-१९ जागतिक महामारीच्या नियंत्रणासाठी सरकारतर्फे राबविण्यात येणार्‍या विविध उपाययोजना अधिक प्रभावी करण्यात आणि लोकांपर्यंत त्याची माहिती, तसेच, वापरकर्त्यास संसर्गाचा संभाव्य धोका, त्यापासून सुरक्षित राहण्याचे उपाय व संबंधित वैद्यकीय सल्ल्यांची माहिती मिळू शकते.

हे ऍप, आपल्या फोनच्या ब्लूटुथ किंवा जीपीएसच्या जवळ येताच आरोग्य सेतु असलेल्या इतर उपकरणांची माहिती तुम्हाला देते. त्यापैकी कुणीही पॉझिटिव्ह असला तर हे अ‍ॅप एखाद्याच्या संपर्कात आलेल्या कालावधीनुसार व परस्पर संवादाच्या वेळी निकटतेच्या आधारे संसर्गाचा धोका ओळखते आणि आपल्याला योग्य ती कृती सुचविते. या ऍपमध्ये स्व – मूल्यांकन चाचणीचीसुविधाही आहे, ज्याद्वारे तुम्हाला कोविड-१९ चा संसर्ग होण्याची शक्यता तपासली जाते व त्यानुसार योग्य तो सल्ला दिला जातो.

या ऍपमध्ये देण्यात आलेल्यासूचना या अत्याधुनिक ब्लूटूथ तंत्रज्ञान, अल्गोरिदम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून दिलेल्या आहेत आणि तज्ज्ञ वैद्यकीयचिकित्सक आणि साथरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या सर्वोत्तम पद्धतींवर आधारित आहेत.

या ऍपद्वारे देण्यात येणार्‍या सूचना या अत्याधुनिक ब्लूटूथ तंत्रज्ञान, आल्गोरिदम व आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या मदतीने पुरविल्या जातात, ज्या तज्ज्ञ वैद्यकीय व्यावसायिक व साथरोगतज्ज्ञांनी सूचविलेल्या आहेत.

हे ऍप गूगल प्ले स्टोअरवरून bit.ly/AarogyaSetu_PSआणि आयओएसवरूनhttps://apple.co/2X1KMz0 या लिंक वापरून डाऊनलोड केले जाऊ शकते.