एनआयटीच्या विद्यार्थ्यांनी देशहितासाठी काम करावे:मुख्यमंत्री

0
879

एनआयटीच्या विद्यार्थ्यांनी देशहितासाठी काम करावे राज्याला, असे आवाहन करताना  आरोग्य, पर्यावरण, प्रदूषण आदी समस्यांपासून मुक्ती देणे आवश्यक आहे. स्वच्छ गोव्यासाठी राज्यात साळगाव कचरा प्रक्रिया प्रकल्पाप्रमाणे आणखी प्रकल्प येणे गरजेचे आहे, असे मत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राजीव कला मंदिरात आयोजित एनआयटी पदवीदान सोहळ्यात बोलताना व्यक्त केले.
एनआयटीच्या विद्यार्थ्यांनी देशहितासाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी ६५ बी.टेक व ४४ एम.टेक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. एनआयटीचे संचालक गोपाळ मुगेराया यांनी संस्थेसाठी जमीन दिल्याबद्दल सरकारचे आभार मानले.