एनआयओकडून करंजाळे किनाऱ्याची स्वच्छता

0
717

गोवा खबर:21 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिवसाच्या निमित्ताने राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांनी करंजाळे सागरी किनारा स्वच्छ केला. संस्थेचे संचालक डॉ सुनील कुमार सिंग, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ महुआ सहा, डॉ राकेश सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली 130 कर्मचारी, वैज्ञानिकांनी यात सहभाग घेतला. करंजाळेच्या एक किलोमीटर

किनारपट्टीवरील 1078 किलो प्लास्टीक कचरा, 480 किलो सेंद्रीय कचरा, कागद, 720 काचेच्या बाटल्या, 125 धातुचे कॅन गोळा करण्यात आले. प्लास्टीकचा वापर टाळून पर्यावरण रक्षण करण्याची गरज असल्याचा संदेश शास्त्रज्ञांनी यावेळी दिला.