एटीएम मध्ये स्किमर बसवणार्‍या विदेशी नागरिकाला अटक

0
847
गोवा:एटीएम मध्ये व्यवहार करणे दिवसें दिवस जोखमीचे होऊ लागले आहे.विदेशी नागरिक देखील एटीएम मशीन मध्ये स्किमर लावून गोपनीय माहिती चोरत असल्याने एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.पणजी पोलिसां केलेल्या करवाईत एक विदेशी नागरिक सापडला असून त्याने पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांची गोपनीय माहिती चोरल्याची कबुली जबाब दिला आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या पणजी  शाखेतील एटीएममध्ये स्कीमर उपकरण बसवल्याप्रकरणी  रोमानियाचा नागरिक अॅलेक्स  पेट्रिका (२८)याला पणजी  पोलिसांकडून अटक करण्यात  आली आहे. पंजाब नॅशनल  बँकेच्या मुख्य व्यवस्थापकांनी  दिलेल्या माहितीनुसार हा स्कीमर २० मार्च रोजी बँकेच्या  एटीएममध्ये बसवण्यात आला  होता. हा स्कीमर ग्राहकांची  गोपनीय माहिती चोरी  करण्यासाठी वापरला जातो. बँकेच्या  व्यवस्थापकडून तक्रार आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.  पणजी चर्च परिसरात संशयित  व्यक्ती फिरत असल्याची माहिती पोलिसांना  मिळाल्याने संशयिताला त्वरित  अटक करण्यात आली. ग्राहकांची गोपनीय माहिती चोरल्याचे  संशयिताने कबूल केले आहे.यापूर्वी पर्वरी येथे देखील अशाच प्रकरणात एका विदेशी नागरिकाला  अटक करण्यात आली होती.