एचडीएफसी बँके ने केला ऑनलाईन बिल पेमेंट्स स्विकारण्यासाठी गोवा इलेक्ट्रिसिटी विभागा बरोबर सहकार्य करार

0
916
– नागरिकांना आता त्यांची वीज बिले ऑनलाईन किंवा पीओएस मशीन्सच्या माध्यमातून भरणे शक्य
– या उपक्रमामुळे आता वीजेची बिले वेगाने आणि सोप्या पध्दतीने भरणे शक्य.
 गोवा खबर:एचडीएफसी बँकेने आज गोवा इलेक्ट्रिसिटी विभागा बरोबर सहकार्य करार करून वीजेची बिले ऑनलाईन किंवा पीओएसच्या माध्यमातून भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.  आता बिल भरू इच्छिणारे लोक संपूर्ण भारतातून विजेची बिले अगदी सोप्या आणि वेगवान अशा ऑनलाईन किंवा पीओएस मशीन्सच्या माध्यमातून भरू शकतील.
पणजी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये या सुविधेची सुरूवात करण्यात आली.
यावेळी माननीय उर्जा मंत्री श्री निलेश काब्राल, एचडीएफसी बँकेच्या गोवा सर्कलचे प्रमुख श्री अजित दळवी, गोवा इलेक्ट्रिसिटी विभागाच्या चीफ इंजिनियर श्रीमती रेश्मा मॅथ्यू, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर श्री मयूर हेडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
सध्या गोव्याचे नागरीक विजबिलांचा भरणा हा रोखीने किंवा चेकच्या माध्यमातून करतात.  याउपक्रमा मुळे त्यांचा प्रवास करण्याचा व बिलांच्या रांगेत उभे राहून बिलांचा भरणा करण्याचा वेळ वाचू शकेल.  या नवीन सुविधेची सुरूवात केल्यामुळे याचा लाभ जवळजवळ ६.४० लाख ग्राहकांना होणार आहे.
एचडीएफसी बँकेच्या गोवा विभागाचे सर्कल हेड श्री अजित दळवी यांनी सांगितले “ या उपक्रमाकरता गोवा इलेक्ट्रिसिटी विभागाबरोबर करार करतांना आंम्हाला आनंद होत आहे.  पेसे देण्याच्या पध्दती मध्ये ही मोठी उत्क्रांती आहे आणि गोव्यातील बिल भरणा करणार्‍या व्यक्तींना आता अधिक लवचिकता देण्या बरोबरच ऑनलाईन किंवा जवळच्या शाखेत पैसे भरण्याची सुविधा देत आहोत.”