एचआरडीचे  शिक्षण मंत्रालय म्हणून  नामांतर करण्याचे स्वागत :आप

0
286
गोवा खबर:नव्या शैक्षणिक धोरणाचा सखोल अभ्यास केल्यावर आपली मते व्यक्त करु अशी प्रतिक्रिया   व्यक्त करताना आम आदमी पक्षाचे संयोजक एल्विस गोम्स यांनी मानव संसाधन विकास मंत्रालय अशा नावाने वावरणाऱ्या मंत्रालयाचे शिक्षण मंत्रालय अशा नाव बदलण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. मनिष सिसोदिया यांनी बरोबर दोन वर्षांपूर्वी मडगाव येथे गोव्यातील शिक्षकांना उद्देशून आपल्या जाहीर भाषणात मानव संसाधन विकास मंत्रालयाचे नाव बदलून शिक्षण मंत्रालय करावे असे सुचवले होते,याची आठवण यनिमित्ताने गोम्स यांनी करून दिली आहे.
मनीष सिसोदिया हे राज्यांमधील सर्वोत्कृष्ट शिक्षणमंत्री म्हणून मानले जातात. व ते सतत ही मागणी करत होते. मानव संसाधन विकास हा ‘शिक्षणाचा फक्त एक आयाम’ आहे, या त्यांच्या तर्कानुसार त्यांची मागणी होती. फक्त मानवी संसाधन म्हणून मुलाचा विकास हा शिक्षणाचा हेतू नव्हता, असे त्यांनी म्हटले होते,असे गोम्स म्हणाले.
मातृभाषेच्या विषयावर कोणतेही मत व्यक्त करण्यापूर्वी  ते समजून घेण्याची गरज आहे. कारण पूर्वी गोव्यातील लोकांमध्ये या विषयी फूट पाडलेली आहे व अशा प्रकारे विभाजन करुन सत्ता धोरणास अनुकूल असलेले राजकारणीच याचा फायदा घेतात, अशी सावध प्रतिक्रिया गोम्स यांनी व्यक्त केली आहे.