‘एक घर मंतरलेलं मालिकेची अनोखी पत्रकार परिषद !!

0
1579

 

 

घराची ओढ प्रत्येकालाच असते, पण असंही एक घर असतं जे तुम्हालाचं ओढून घेतं.हे वाक्य जेवढं गूढ आहे तशीच झी युवा वाहिनीवर प्रदर्शित झालेली नवीन मालिका सुद्धा आहे . काहीतरी अनपेक्षित गूढ आणि रहस्यमय अशी ही नवीन मालिका ‘एक घर मंतरलेलं’ ४ मार्चपासून सोमवार ते शनिवार रोज रात्री ९:३० वाजता झी युवा वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या आगळ्यावेगळ्या विषयावरील मालिकेचा लॉन्चदेखील तसाच निराळ्या पद्धतीने पार पडला.

 

‘एक घर मंतरलेलं’ या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेले सुरुची अडारकर व सुयश टिळक यांच्या उपस्थितीत बॉनफायरचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईतील थंडी अजूनही पळाली नसली, तरी या बॉनफायरचं कारण मात्र वेगळं होतं. नेहमी आगळे विषय घेऊन येणाऱ्या ‘झी युवा’ या वाहिनेने, प्रेस कॉन्फरन्सची नियमित पद्धत बाजूला ठेवत, एक नवा प्रयोग केला. मीडियामधील मंडळी व मालिकेचे कलाकार यांच्या गप्पांच्या माध्यमातून ही प्रेस कॉन्फरन्स झाली. सुयश आणि सुरुचीच्या  मीडियामधील मित्रमंडळींनी सुद्धा या खास प्रेस कॉन्फरन्सला हजेरी लावली. गप्पा, मजामस्ती आणि बॉनफायर यांनी भरलेली एक धमाल संध्याकाळ, असे या प्रेस कॉन्फरन्सचे स्वरूप होते.

 

सुरुचीने साकारलेले मालिकेतील  रिपोर्टर गार्गी महाजन हे पात्र, बिनधास्त व बेधडक आहे. जे सत्याच्या शोधात असतं , मात्र  खऱ्या आयुष्यात कोणत्याही भयावह  गोष्टींची तिला भीती वाटत असल्याचे तिने गप्पांमध्ये सांगितले. शूटिंगच्या निमित्ताने ही भीती निघून जाईल, असेही सांगायला ती विसरली नाही. आपल्याला आलेले  भीतीदायक अनुभव, भुताखेतांवरील विश्वास व अविश्वास, यावरही सगळ्यांच्या गप्पा रंगल्या. अभिनेता सुयश टिळकने त्याच्या ओळखीच्या लोकांचे काही भीतीदायक अनुभव कथन केले. सुहृद वार्डेकर या मालिकेत रिपोर्टर गार्गीच्या कॅमेरामॅन आणि एक मित्र या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल . तो सुद्धा या प्रेस कॉन्फरन्स ला उपस्थित होता आणि त्यानेही त्याला आलेले कीस्से सगळ्यांना ऐकवले .

 

‘एक वेगळा प्रयोग, फारच उत्तमरीत्या पार पडला’ अशा शब्दांत झी युवाच्या या प्रेस कॉन्फरन्सचे वर्णन उपास्थित लोकांनी केले. एका अनोख्या प्रकारे लॉन्च करण्यात आलेली ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची ठरेल याची खात्री आहे. सोमवार, दिनांक ४ मार्चपासून, दर सोमवार ते शुक्रवार, झी युवा वाहिनीवर रात्री ९.३० वाजता ही ‘मंतरलेली’ मालिका पाहता येईल. झी युवा वाहिनीवरील सर्व कार्यक्रम बघत राहण्यासाठी ३९ रुपयांचा ‘ झी फैमिली पॅक’   नक्की निवडा…या मध्ये तुमचे मनोरंजन करण्याऱ्या २० झी वाहिन्या आपल्याला पाहायला मिळतील.