एक घर मंतरलेलं … झी युवावर हृदयाचा ठोका चुकवणारी एक नवीन मालिका!!

0
1251

 

मार्च पासून सोमवार ते बुधवार रात्री :३० वाजता

तुमचं घर आहे ना सुरक्षित??”

 

गोवा खबर:घराची ओढ प्रत्येकालाच असते, पण असंही एक घर असतं जे तुम्हालाचं ओढून घेतं … काय झालं.  स्वतःच्या घराबद्दल मनात तसा विचार आला ना?? रात्री झोपल्यावर तुमचं घर काय करत असेल? रात्री जेव्हा तुम्ही पाणी प्यायला उठता तेव्हा पाण्याच्या फिल्टरच्या बाजूला काही हलल्याचा भास कधी जाणवला आहे? किंवा बिछान्यात झोपलो असता बिछाना तुटून तुम्ही खोल पाताळात शिरत आहात असा अनुभव कधी घेतलाय? किंवा तुमच्याच घरात रात्री समोर कोणीतरी अनोळखी व्यक्ती उभी आहे असे वाटले आहे?? मनात थोडंसं चिर्रर्र झालं ना .. असंच किंवा याहून काहीतरी अनपेक्षित असंभवनीय गूढ आणि रहस्यमय अशी नवीन मालिका झी युवावर येत आहे .

आजपर्यंत झी युवा ही वाहिनी त्यावर सुरु असलेल्या विविध मालिकांद्वारे प्रेक्षकांचे  मनोरंजन करत होतीच पण ही मालिका इतर मालिकांपेक्षा नक्कीच पूर्णपणे वेगळी असेल . ही मालिका निर्माण करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये अनेक गोष्टींची काळजी घेतली जात आहे . एक घर मंतरलेलं या मालिकेचा विषय ठरला मात्र गोष्ट ठरताना असंख्य गोष्टीमधून  येणारी गोष्ट निवडली गेली.  उत्कृष्ट कथा , उत्तम दिग्दर्शक , लोकप्रिय कलाकार , उत्तम सेट आणि हे सर्व नीटपणे सांभाळणारा योग्य निर्माता घेऊन झी युवा एका नव्या पर्वाची सुरुवात करत आहे . प्रेक्षकांना काय आवडते आणि काय नाही आवडणार , कथा कशाप्रकारे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणार , कोणत्या वेळेला ही मालिका प्रेक्षकांना पाहायला आवडेल या अश्या असंख्य गोष्टींचा विचार करून ‘एक घर मंतरलेलं’ ही मालिका झी युवावर मार्च च्या पहिल्या आठवड्यात ४ मार्च पासून सोमवार ते शनिवार  रात्री ९:३० वाजता प्रदर्शित होणार आहे.

या मालिकेबद्दल बोलताना झी युवा चे बिझिनेस हेड बवेश जानवलेकर म्हणाले, ” झी युवाने आजवर अनेक उत्कृष्ट मालिका प्रेक्षकांना दिल्या , पण ही मालिका नक्कीच वेगळी असणार आहे . प्रेक्षकांच्या मनात भास आभासांच वादळ निर्माण करण्यास ही मालिका सफल होईल असा मला विश्वास आहे. प्रेक्षकांना उत्तम विषय आणि त्या विषयाची योग्य हाताळणी करत एक चांगली मालिका देण्याचा झी युवा वाहिनीचा मानस आहे. त्याचबरोबर आम्ही संध्याकाळी ९:३० वाजता   या प्रकारची मालिका वाहिनीवर आणून एक वेगळा प्रयत्न करत आहोत. मला खात्री आहे की ही  मालिका प्रेक्षकांना आवडेल “