एअर मार्शल प्रदीप बापट यांनी स्वीकारला भारतीय हवाई दलाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यभार

0
1247

 

गोवा खबर:एअर मार्शल प्रदीप पद्माकर बापट (विशिष्ट सेवा पदक) यांनी नोव्हेंबर 2018 रोजी भारतीय हवाई दलाचे हवाई प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला. एअर मार्शल प्रदीप बापट यांनी हवाई दलाच्या प्रशासकीय शाखेत 28 मे 1983 रोजी रुजू झाले.

दक्षिण आफ्रिकेत झालेल्या गोल्डन ईगल’ या संयुक्त कवायतीत सहभागी झालेल्या हवाई दल चमूचे ते सदस्य होते. उत्तम खेळाडू असणारे बापट हवाई दलाच्या सायकल पोलो संघाचे वर्ष व्यवस्थापकही होते.

हवाई दलातल्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना 2014 मध्ये विशिष्ट सेवा पदकाने सन्मानीत करण्यात आले.