ऍलोयसिसच्या मृत्युला पूर्णपणे सरकार जबाबदार:बहीण अलिशा अल्वारीस हीचा आरोप

0
843

गोवा खबर:म्हापसा ते पणजी राष्ट्रीय महामार्गवर असलेले ग्रीनपार्क हॉटेल ते करासवाडा जंक्शनपर्यंत रस्त्यांचे बांधकाम सुरु आहे. परंतु येथे यासंदर्भातील कुठल्याही प्रकारचा सूचना फलक लावण्यात आला नाही. तसेच येथे पथदीप देखील नाही आहेत. या कारणास्तव येथे माझा एकुलता एक भाऊ ऍलोयसिस अल्वारीसचा अपघाती मृत्यु झाला. असा आरोप मयत ऍलोयसिस अल्वारीस याची बहीण अलिशा अल्वारीस हीने केला.

पणजीत आझाद मैदानावर अल्वारीस कुंटूबियांनी पत्रकार परीषद घेतली. यावेळी अलिशा अल्वारीस बोलत होत्या. यावेळी  मयत ऍलोयसिसचे वडील अँथनी अल्वारीस, सासरे थॉमस अल्वारीस, भावोजी नेल्सन डिसोझा, व  रोहन पिंटो उपस्थित होते.

माझ्या भावाच्या मृत्युला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. सरकारच्या, सार्वजनीक बांधकाम खात्याच्या कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली आहे. आणि या संबधात कोणतीही कारवाई झाली नाही तर आम्ही न्यायालयात जाणार आहोत. असेही अलिशा अल्वारीस हीने पूढे सांगितले.

आता तरी सरकारने या घटनेतून बोध घेऊन कामे करावीत. तसेच कंत्राटदाराने पूर्ण नियमांचे पालन करुन कामे हाती घ्यावी. निष्काळजीपणाने आणि कुणाचा जीव जाऊ शकतो हे लक्षात ठेवावे. त्याचप्रमाणे या रस्त्यावर त्वरीत दिपस्तंभ लावावे. असे भावूक आवाहन देखील अलिशा हीने यावेळी केले.