उपसंचालक रविराज सरतापे यांनी पणजी दूरदर्शनच्या वृत्त विभागाची सूत्रे स्वीकारली

0
1213

 

 

गोवा खबर:माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे पणजी येथील दूरदर्शन केंद्रातील वृत्त विभागाची जबाबदारी उपसंचालक रविराज सरतापे यांना सोपविण्यात आली आहे. सोमवार दिनांक 2 जुलै रोजी त्यांनी आपला कार्यभार स्वीकारला.

यापूर्वी सरतापे दिल्ली दूरदर्शनच्या वृत्त विभागात दोन वर्षे कार्यरत होते. सरतापे हे भारतीय माहिती सेवेच्या २०१२च्या तुकडीचे अधिकारी असून पत्र सूचना कार्यालय, नवी दिल्ली येथून त्यांची बदली पणजी दूरदर्शन मध्ये झाली आहे. पृथ्वी विज्ञान तसेच विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयासाठी त्यांनी प्रवक्ते म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.

 

सरतापे यांनी महाराष्ट्रातील सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथून यांत्रिक अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजिनिअरींग) या विषयात पदवी घेतली आहे. अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर त्यांनी दोन वर्षे सॉफ्टवेअर कंपनीमध्ये देखील काम केले आहे.