उपमुख्यमंत्र्याकडू बार्से येथील विकास कार्याचा आढावा

0
831

 गोवा खबर: उपमुख्यमंत्री श्री. चंद्रकांत कवळेकर यानी बार्से, केपे, पाड्डी ग्रामपंचायत भागात हाती घेण्यात येणाऱ्या कामांचा आणि चालू विकास कामांचा बैठकीत आढावा घेतला

सदर बैठकीस केपेचे उपजिल्हाधिकारी रोहित कदम, मामलेदार, संयुक्त मामलेदार, गट विकास अधिकारी, सरपंच, बार्से- केपे ग्रामपंचायतीचे पंच सदस्य, कृषि खाते, आदिवासी कल्याण, वन, पाणी पूरवठा, शिक्षण, पंचायत अशा विविध सरकारी खात्यातील वरिष्ठ अधिकारी आणि पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.

सुरवातीस बार्से- केपेचे सरपंच श्री माळू वेळीप यानी नवीन गतिरोधक उभारणे, पंचायत घरासाठी नवीन जागा, सर्व रस्त्यांचे हॉटमिक्स करणे, भूमीगत विजवाहिनी टाकणे, दिवाबत्तीची दुरुस्ती करणे, रस्ते आणि संरक्षक भिंत उभारण्यासाठी व पेव्हर्स बसविण्यासाठी ज्यादा देणगी देणे अशी विकास कामाची यादी सादर केली.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्र्यानी केपे मतदारसंघाचे प्रतिनिधी असल्याने मतदारसंघाचा  विकास करणे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्र्यानी प्रत्येक व्यक्तीना, पंच सदस्य तसेच सरकारी अधिकाऱ्याना सोसाव्या लागणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी पुढे येण्याचा सल्ला दिला.